Homeताज्या बातम्यादेश

सेबी प्रमुखांची परदेशी फंडामध्ये भागीदारी

यात अदानींचीही गुंतवणूक हिंडेनबर्गचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली ः भारतीय शेअर बाजार आज सोमवारी उघडण्यापूर्वीच पुन्हा एकदा नवा भूकंप शेअर बाजारात बघायला मिळू शकतो. कारण अमेरिकन शॉर्ट सेल फर्म हिंडेनब

राज ठाकरे यांस पत्र ; पत्रास कारण कि…
राज्यात शरद पवारच दाउदचा माणूस | LOKNews24
शिराळा न्यायालयाकडून पुन्हा राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट; शिरीष पारकरांना जामीन

नवी दिल्ली ः भारतीय शेअर बाजार आज सोमवारी उघडण्यापूर्वीच पुन्हा एकदा नवा भूकंप शेअर बाजारात बघायला मिळू शकतो. कारण अमेरिकन शॉर्ट सेल फर्म हिंडेनबर्गने नवा आरोप करतांना म्हटले आहे की, सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच व त्यांचे पती धवल बुच यांची मॉरिशसमधील ऑफशोअर कंपनी ‘ग्लोबल डायनॅमिक अपॉर्च्युनिटी फंड’ यामध्ये भागीदारी आहे. त्यात गौतम अदानी व त्यांचे बंधू विनोद यांनी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे सोमवारी शेअर बाजारात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे.
हिंडेनबर्गने व्हिसल ब्लोअर कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला. या पैशांचा वापर शेअर्सच्या किमतीत तेजीसाठी केला. मात्र सेबीच्या अध्यक्षांनी सदर आरोप फेटाळून लावले आहे. हिंडेनबर्गने अदानी समूहावर केलेल्या दाव्याचे पुरावे आहेत आणि 40 हून जास्त स्वतंत्र माध्यम पडताळणीत सेबीने कारवाई केली नाही. त्यांच्या मते पडताळणीची जबाबदारी सेबीच्या अध्यक्षांची होती. परंतु सेबीने 27 जून 2024 रोजी आम्हालाच नोटीस पाठवली असल्याचे म्हटले आहे. वास्तविक अदानीवरील 106 पानी अहवालात सेबीला त्रुटी आढळली नाही. हिंडेनबर्गने जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहावर अनेक दावे केले होते. त्यानंतर समूहाचे मूल्यांकन 7.20 लाख कोटी रुपये पर्यंत घसरले. प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात गेले. तेथे अदानी समुूहाला क्लीन चिट मिळाली होती. हिंडेनबर्गने शनिवारी ‘भारतात लवकरच काहीतरी मोठे घडणार आहे’ असे म्हटले होते. हिंडेनबर्गने केलेल्या आरोपात माधबी बुच सेबीच्या पूर्णकालीन सदस्य होण्याच्या काही आठवडे आधी 22 मार्च 2017 रोजी त्यांचे पतीन धवल बुच यांनी मॉरिशस फंड प्रशासक ट्रायडेंट ट्रस्टला ई-मेल पाठवला होता. फंड एकट्याने ऑपरेट करण्याची विनंती मेलमध्ये धवल यांनी प्रशासकाला केली होती. सेबीच्या अध्यक्षपदासारख्या महत्त्वाच्या राजकीय नियुक्तीपूर्वी पत्नी माधवी यांचे नाव या गुंतवणुकीतून हटवण्याची धवल यांची इच्छा होती असाही गौप्यस्फोट हिंडेनबर्ग या अहवालातून करण्यात आला आहे.  माधबी पुरी बुच या सेबीच्या अध्यक्षा आहेत. एप्रिल 2017 पर्यंत त्या माजी प्रमुख अजय त्यागी यांच्यासह सेबीच्या पूर्णकालीन सदस्याच्या रुपाने काम करत होत्या. त्यागी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडे शेअर बाजार नियामक संस्था सेबीचे प्रमुख पद सोपवले गेले. 28 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी केली होती.

अधिवेशन स्थगित करण्याचे कारण आता समजले ः जयराम नरेश – काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर तिरकस टिप्पणी केली. संसद अधिवेशन 9 ऑगस्ट रोजी अचानक स्थगित का केले हे आता समजले. त्यांनी लॅटिन वाक्यही वापरले आहे. त्याचा आशय ‘सुरक्षा रक्षकाची सुरक्षा कोण करेल?’ असा आहे. उद्धवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, सेबीने अदानींच्या कंपन्यांचा तपशील का दिला नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

हिंडनबर्गचा रिपोर्ट तथ्यहीन ः माधवी पुरी बुच – हिंडेनबर्ग यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी परिपत्रक जारी करून शॉर्टसेलर हिंडेनबर्गने केलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, सेबीने हिंडनबर्ग विरुद्ध तपास करुन कारवाई केली होती आणि कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावरुन आता हिंडनबर्गने माझ्यावर चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या आरोपांचा सत्याशी काहीही संबंध नाही. माधबी पुरी बुच यांनी या संयुक्त निवेदनात स्पष्ट केले की, आमचे जीवन आणि आमचे व्यवहार हे एक खुले पुस्तक आहे, आम्ही वेळोवेळी सेबीला सर्व खुलासे दिले आहेत.

COMMENTS