Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता शहरात अतिक्रमणविरोधी मोहीमेला वेग

राहाता ः राहाता नगरपरिषदचे  मुख्याधिकारी  वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील  नगर मनमाड रोड लागत असलेले दुकाने, हा

अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्काराने वसंत रांधवण सन्मानित
वीस खेळाडूंनी पटकावले सुवर्णपदक
दि फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’

राहाता ः राहाता नगरपरिषदचे  मुख्याधिकारी  वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील  नगर मनमाड रोड लागत असलेले दुकाने, हातगाड्या, फेरीवाले तसेच छोटे-मोठे दुकान रोडवर थाटणार्‍या व्यवसायिकांनी गटारीच्या पुढे केलेले अतिक्रमण शुक्रवारी सकाळी 11 वा. दरम्यान अतिक्रमण विरोधी पथकाने काढले.
छत्रपती शिवाजी चौक राहाता पोलीस स्टेशन या दरम्यान नेहमी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. या दुकानांमुळे पायी चालणारे पदचारी, दुचाकी, चारचाकी, जड वाहतूक यांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत आहे,  गेल्या महिन्यात येथे रोड लगत असलेल्या चहाच्या दुकानासमोर अपघात होऊन ग्रामपंचायत सदस्य असलेल्या एका युवकास आपले प्राण गमवावे लागले. या महामार्गावर प्राथमिक ,माध्यमिक शाळा, महाविद्यालय, बस स्थानक मोठमोठे हॉस्पिटल पेट्रोल पंप मंगल कार्यालय व लॉन्स तसेच राहता पोलीस स्टेशन शासकीय कार्यालय महामार्ग लगत असल्यामुळे मोठी वर्दळ या ठिकाणी नेहमी असते त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात होत असतात त्यात काही लोकांना आपल्या प्राणास मुकले लागले तर काहींना अपंगत्व आले आहे. सामाजिक जाणीव ठेवून रहदारीच्या सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे परंतु तसे होताना दिसत नाही अशी नागरिकात चर्चा आहे बेशिस्त वाहतूक बेशिस्त दुचाकी आणि चार चाकी वाहनांची पार्किंग रहदारीच्या ठिकाणी अति वेगात वाहने चालवणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे असे प्रकार होत असल्याने या बाबींकडे राहाता पोलीस ठाणे केव्हा लक्ष देणार हा मुद्दा नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या अतिक्रमण काढण्यामध्ये राहाता नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

COMMENTS