Homeताज्या बातम्याविदेश

अमन सेहरावतला कुस्तीमध्ये कांस्यपदक

मॅचपूर्वीच्या 10 तासांमध्ये 4.6 किलो वजन केले कमी

पॅरिस ः ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने पुन्हा एकदा कांस्यपदकावर नाव कोरले आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्यपदक पटकावले आहे. अमनने मॅचमध्य

वनडे क्रमवारीत विराट कोहलीची सहाव्या स्थानी झेप
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय
राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटणनगरी सज्ज

पॅरिस ः ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताने पुन्हा एकदा कांस्यपदकावर नाव कोरले आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्यपदक पटकावले आहे. अमनने मॅचमध्ये प्यूर्टो रिकोच्या डारियन टोई क्रूजचा 13-5 असा पराभव केला. 21 वर्षांचा अमन ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात वैयक्तिक मेडल मिळवणारा सर्वात तरुण भारतीय आहे. त्याचबरोबर 2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये मेडल जिंकण्याची भारतीय परंपरा अमनने कायम ठेवली आहे. अमनचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. अमनने गुरूवारी झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये अमनचा पराभव झाला. त्यावेळी त्याचे वजन 61.5 किलो होते. या पराभवानंतरही अमनपुढचे आव्हान संपलेले नव्हते. 57 किलो वजनी गटातील ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळण्याासाठी त्याला 10 तासांमध्ये 4.5 किलो वजन कमी करण्याची गरज होती. अमनने दुसर्‍या दिवशी सकाळी वजन यंत्रावर त्याचे वजन तपासले, त्यावेळी त्याने कोच जगमंदर सिंह आणि विरेंद्र दहिया यांच्यासोबत केलेल्या कष्टाचा चीज झाले होते. अमनने तब्बल 4.6 किलो वजन कमी केले. तो 56.9 किलो ग्रॅम वजनासह कांस्य पदकासाठी मॅच खेळण्यासाठी पात्र झाला.

COMMENTS