Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री संत सदगुरु गोदड महाराज जन्मोत्सव सोहळा 15 ऑगस्टला

कर्जत : कर्जत येथील श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर कर्जत

कॉम्रेड कातोरे हल्ला प्रकरणाची माकप राज्य कमिटीकडून दखल
लोखंडी रॉडने मारहाण,कोपरगावात नऊ जणांवर गुन्हा दाखल
LokNews24 l फोन टॅपिंग करून सरकारचा डाव उलटला

कर्जत : कर्जत येथील श्री संत सदगुरु गोदड महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर कर्जतच्या पाटील गल्ली येथील जन्मस्थळी करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी 9 ते 11 या वेळेत हभप दयानंद महाराज कोरेगांवकर यांचे जाहीर हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. जन्मोत्सवाच्या दिवशी भाविकांनी घरासमोर सडा, रांगोळी, तोरण व गुढी उभारून महाराजांच्या जन्माचे उत्स्फूर्तपणे स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दुपारी साडेबारा वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होऊन श्री संत सदगुरु गोदड महाराजांच्या जन्मोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कर्जत पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, सदगुरु गोदड महाराज जन्मस्थळ मंदिर ट्रस्ट, पै. प्रविण घुले पाटील मित्र मंडळ, कर्जत तालुका, जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तानाजी पाटील तसेच अधिकृत सदगुरु गोदड महाराज अन्नछत्र मंडळ यांनी केले आहे.

COMMENTS