Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकही बंधारा न बांधणारे जलपूजन करत आहेत ः वैभवराव पिचड

अकोले ः ज्यांना कधी साधा बंधारा बांधता आला नाही, कुठे पाणी अडवले नाही आणि चाळीस वर्षात पिचड यांनी काहीच केले नाही असे खोटे सांगून 2019 ला निवडून

कर्मवीर काळे विद्यालयाचा दहावीचा निकाल 95.6 टक्के
पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव
शहराची वाट लावण्यात महापालिकेचे योगदान सर्वाधिक

अकोले ः ज्यांना कधी साधा बंधारा बांधता आला नाही, कुठे पाणी अडवले नाही आणि चाळीस वर्षात पिचड यांनी काहीच केले नाही असे खोटे सांगून 2019 ला निवडून आले तेच आता मधुकरराव पिचड यांनी बांधलेल्या धरणांचे जलपूजन करत आहे  असा टोला माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमदार डॉ. किरण लहामटेंना लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते सोमदास पवार हे होते. यावेळी व्यासपीठावर, रावसाहेव वाकचौरे, यशवंत आभाळे, आप्पा आवारी, अरुण शेळके, पांडूरंग कचरे, विश्‍वनाथ महाराज शेटे, विद्या परशुरामी, किसनराव शिरसाठ, बाळासाहेब सावंत,आनंदराव वाकचौरे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना वैभवराव पिचड म्हणाले की अकोले तालुक्यातील पाणी, आरोग्य यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांसाठी मी आमदारकी मागतोय मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे. जनतेच्या पाठबळावर आमदारकीसाठी तुमच्यासमोर येतोय मला तुम्ही साथ द्या, पक्षाकडून उमेदवारी मिळो अगर न मिळो  प्रसंगी पक्ष कोणताही असो आपण माझ्यासोबत राहाल अशी खात्री आहे म्हणून मी आमदारकीसाठी पुन्हा येतोय असे सांगत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी आमदारकी साठी दंड थोपटले. राज्यात महायुतीचे सरकार आहे उमेदवारीसाठी अकोल्यातील जागेचा निर्णय अद्याप झाला नसला तरी जागा कोणाकडे ही असो पक्षाकडून उमेदवारी मिळो अगर न मिळोपण मी आमदारकीसाठी पुन्हा येतोय पक्ष, चिन्ह कोणते असेल काय असेल याचा विचार करू नका पूर्ण ताकदीने या लढाईत उतरायचे आहे. यासाठी तुम्हा सर्वांची साथ असू द्या अशी साद घालत माजी आमदार वैभव पिचड  यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकी सज्ज रहा असा आदेश देत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील देशमुख म्हणाले की, मागील वेळेस आपण  2019 ला आपण चुकीच्या गाडीत बसलो आता त्याचा त्रास आपण भोगतोय आता पुन्हा ही चूक करू नका. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी कधी खुनशी राजकारण केले नाही कारखाना आपल्या ताब्यात नसताना ही त्यांनी भाजप सरकारकडून 100 कोटींची मदत मिळवून दिली. 2024 मध्ये वैभवराव  पिचड यांना आमदार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने  प्रयत्न करावे असे आवाहन केले. याप्रसंगी संजय लोखंडे, नरेश साळवे, सचिन गिते, भाऊसाहेब गोडसे पप्पू चौधरी, जालिंदर पापाळे, चंदू गोंदके शाम देशमुख राम तळेकर, अर्जुन गावडे, रमेश शिंगोटे, संतोष कचरे, कविराज भांगरे, लहू काळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी  मुळा परिसरातील चास, पिंपळदरी, लिंगदेव लहित बेलापूर, ब्राह्मणवाडा, सातेवाडी, पाडाळने, पैठण,आंभोळ पिंपळगाव खांड, कोतुळ, बोरी, वाघापूर परिसरातील  शेकडो कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS