Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्य लढ्यात क्रांती दिनाचे महत्त्व अतुलनीय ः थोरात

संगमनेरमध्ये काँग्रेसच्या वतीने क्रांती दिन उत्साहात साजरा

संगमनेर ः 1857 पासून सुरू झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक थोर पुरुषांनी व क्रांतीकारांनी बलिदान दिले. 9 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रपिता महात्

फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत ः थोरात
शेतकर्‍यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व ः थोरात
कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील

संगमनेर ः 1857 पासून सुरू झालेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक थोर पुरुषांनी व क्रांतीकारांनी बलिदान दिले. 9 ऑगस्ट 1942 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी  चले जावची घोषणा देऊन स्वातंत्र्याचे आंदोलन व्यापक केले. सर्व देशवासीयांना प्रेरणादायी असणार्‍या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात   मोठे महत्त्व असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. संगमनेर नगरपालिका संगमनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने संगमनेर शहरात 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नेहरू चौक येथे अशोक स्तंभ अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते या प्रसंगी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, शहराध्यक्ष सोमेश्‍वर दिवटे, मिलिंद कानवडे, प्रा बाबा खरात, सुरेश थोरात, सुरेश झावरे गणेश मादास, गजेंद्र नाकील, जीवन पांचारिया, गणेश मादास, संग्राम जोंधळे, अजित काकडे, गजेंद्र अभंग, अंबादास आडेप, वैष्णव मुर्तडक, यांच्यासह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या प्रसंगी डॉ जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली बाजारपेठ- मेन रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी आमदार थोरात म्हणाले की, क्रांती दिन 9 ऑगस्ट, हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस आहे. 1942 साली महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केले,  या दिवशी भारतीय जनतेने इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले. क्रांती दिनाच्या निमित्ताने या दिवसाचे महत्त्व, त्याची पार्श्‍वभूमी, घटना आणि परिणाम याबद्दल विचार करणे आवश्यक आहे.  क्रांतिदिन हा दिवस आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून देतो. क्रांती दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक राष्ट्रपुरुष कार्यकर्ते आदिवासी नेते स्वातंत्र्यसैनिक यांचे मोठे योगदान राहिले आहे. घटनेने लोकशाही लोकांना दिलेली ताकद आहे. या घटनेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहिले पाहिजे. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी अशोक स्तंभाला अभिवादन केले.

युवक काँग्रेसने काढली प्रभात फेरी – युवा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नेहरू चौक येथून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी बाजारपेठ- गांधी चौक- मेन रोड- चावडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गे ही प्रभात फेरी आली. भारतीय स्वातंत्र्याच्या घोषणांनी आज संगमनेर शहर सकाळी दुमदुमले.

COMMENTS