पुणे: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे
पुणे: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे थोडक्यात बचावले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना क्रेनच्या ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्याने जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, महबुब शेख थोडक्यात बचावले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून सर्वजण थोडक्यात बचावले आहेत.
यात्रेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळातील कारनाम्यांचा जनतेपुढे पर्दाफाश केला जाईल अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. दरम्यान रोहित पवार, रोहीत पाटील या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित नसल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अजित दादांच्या यात्रेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही यात्रेची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या यात्रेचे नाव शिवस्वराज्य असे आहे. हा यात्रेचा दुसरा टप्पा असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
COMMENTS