वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल

पाथर्डी/प्रतिनिधी : वीज चोरी रोखण्यासाठी विज चोरी करणाऱ्यावर महावितरण कार्यालयाकडून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून,त्याच अनुषंगाने शहरात

नगर शहरात शिवसेनेचा आमदार करणारच : भाऊ कोरगावकर
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर l LokNews24
नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…

पाथर्डी/प्रतिनिधी : वीज चोरी रोखण्यासाठी विज चोरी करणाऱ्यावर महावितरण कार्यालयाकडून कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून,त्याच अनुषंगाने शहरातील आठ ग्राहकांवर ५ हजार सातशे तीन युनिट चोरी केल्याप्रकरणी १ लाख तीन हजार ४४० रुपये दंड केला असल्याची माहिती शहर सहायक अभियंता मयूर जाधव यांनी दिली आहे. ही कारवाई शहरातील वामनभाऊ नगर म्हस्के कॉलनी,विजयनगर नाथनगर या भागात करण्यात आली असून त्यांना दंडाची रक्कम भरण्यासाठी चोवीस तासाची मुदत महावितरणकार्यालयाकडून देण्यात आली तसेच त्यांनी दंड न भरल्यास त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या पथकात प्रमुख सहाय्यक अभियंता हितेश ठाकूर,सहाय्यक अभियंता मयूर जाधव,आस्थापना विभागाचे प्रवीण घोरपडे,लेखा विभागाचे दीपक मुसळे,गणेश वायखिंडे,दहीफळे, म्हस्के,जाधव,धायतडक ,बर्डे, वाधवने,प्रधान तंत्रज्ञ अन्नदाते, शिरसाठ,इत्यादी विज कर्मचारी सहभागी झाले होते.

COMMENTS