Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार कुस्ती मल्लांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सर्वोदय विद्यालयाच्या इतिहासात मानाचा तुरा

अकोले ः अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध

चित्रा वाघ यांनी अनुचित घटनांना वाचा फोडण्याचे काम केले
कोपरगावमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात
आमदार शिंदेंसाठी मी बेरर चेक ः फडणवीस

अकोले ः अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळख असलेल्या राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.येथील सर्वोदय विद्यालयाच्या चार कुस्ती मल्लांची लखनौ येथे होणार्‍या इंटरसाई राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धांमध्ये इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेत असलेले बोर्‍हाडे जयेश गणेश याने सुवर्णपदक मिळविले असून,लोहरे निलेश गणपत,मुर्तडक सुरज संजय व जाधव ईश्‍वरी पोपट यांनी कास्यपदक मिळविले असल्याची माहीती विदयालयाचे प्राचार्य बादशहा ताजणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.या सर्व कुस्तीपट्टूंना आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच तान्हाजी नरके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.विदयालय विविध स्पर्धांमध्ये नेहमीच आपले नाव रोशन करत आहे. त्यामुळे या यशाबद्दल विदयालय,विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजेत्या सर्व कुस्तीपट्टूंचे तसेच मार्गदर्शक कोच तान्हाजी नरके यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल.मुठे, माजी सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर,अशोक मिस्त्री, विजय पवार,विलास पाबळकर,शिक्षण निरिक्षक लहानु पर्बत,व्यवस्थापक प्रकाश महाले,प्राचार्य बादशहा ताजणे, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख,माजी प्राचार्य मनोहर लेंडे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,क्रीडा शिक्षक जालिंदर आरोटे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS