Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कवाद पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी उमेदवारांचा गौरव

अमोल शिंदे, सचिन ढवण, अक्षय भांबरे यांचा सत्कार

निघोज ः बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निघोज येथील  अमोल कैलास शिंदे , सचिन नाथा ढवण यांची महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फ

नगरमधील सर्व दुकाने आजपासून बंद ; फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा
घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांनी आणला महापालिकेला वात ; 88 हजारावर नगरकरांकडे तब्बल 203 कोटीची येणे बाकी
नगरकरांनो, घरपट्टी व पाणीपट्टी माफी मिळणार नाही…; कोविड ही नैसर्गिक आपत्ती नसल्याचे महापालिकेने केले स्पष्ट

निघोज ः बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने निघोज येथील  अमोल कैलास शिंदे , सचिन नाथा ढवण यांची महाराष्ट्र राज्य सेवा आयोगामार्फत एम.पी.एस.सी परिक्षेत यश संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा पुणे विभागात (कालवा निरीक्षक ) पदी निवड  झाल्याबद्दल व अक्षय पांडुरंग भांबरे यांची इंडियन आर्मी मध्ये फार्मसिस्ट पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.वसंत कवाद  व संचालक मंडळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .  

     यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगीतले की या सर्वांनी  स्पर्धा परिक्षा मध्ये कठोर परिश्रम घेऊन हे यश संपादन केलेले असून पुढील काळात आपल्या परिसरातील मुलामुलींना युपीएससी व एमपीएससी परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी आपल्या विभागाचे खासदार निलेशजी लंके यांनी आपल्या गावामध्ये अभ्यासिका मंजूर करुन भव्य इमारतीचे बांधकाम झालेले असून आपण श्री. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या माध्यमातून आपण आभ्यासिकेसाठी लागणार्‍या सेवा, सुविधा पुरविण्याचे कामकाज करत आहोत. अभ्यासिकेमध्ये आपल्या तालुक्यातील, परिसरातील उच्चशिक्षित अधिकारी यांचे ही आपण मागदर्शन घेणार आहोत. परिसरातील मुलामुलींना पुढील काळात होणारे वेगवेगळे बदल परिक्षांचे स्वरूप कसे असेल या संदर्भात मार्गदर्शन करावे. आपण नोकरी करीत असताना प्रामाणिकपणे सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचे  काम प्रामुख्याने करावे अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके ,व्हा . चेअरमन नामदेव मामा थोरात संचालक चंद्रकांत लामखडे, भिवाशेठ रसाळ, बाबाजी कळसकर, निघोज परिसर कृषी फलोदयान संस्थेचे उपाध्यक्ष अमृता रसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके, संपत ठुबे, उपव्यवस्थापक शांताराम सुरकुंडे, रायचंद गुंड, भाऊ रसाळ, कैलास शिंदे गुरुजी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तात्रय लंके यांनी केले आभार शांताराम कळसकर यांनी मानले. 

COMMENTS