नवी दिल्ली ः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक होण्यास अवघ्या काही महिन्यांचा अवधी असतांना राजधानी दिल्लीत खलबते वाढले आहेत. मंगळवारी ठाकरे गटाचे
नवी दिल्ली ः महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक होण्यास अवघ्या काही महिन्यांचा अवधी असतांना राजधानी दिल्लीत खलबते वाढले आहेत. मंगळवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले असून, बुधवारी त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांशी भेटी घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडी एकसंधपणे लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्वच नेते राजधानीत असल्यामुळे राजधानीत आपण नेत्यांच्या भेटी घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, या वेळी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केले. इतर देशात काय घडत आहे हे पहावे लागेल. इस्राइल, श्रीलंका, बांगलादेशमध्ये काय होतेय याकडे सरकारने लक्ष देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जनतेचे न्यायालय सर्वात मोठे असते, जनतेच्या न्यायाचा निर्णय बांगलादेशमध्ये झाला आहे. लोकांची भावना समजून घेतली पाहिजे, असे देखील ते म्हणाले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत असतील तर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलावीत, असे आवाहन देखील त्यांनी केले. बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी ही मोदी सरकारची असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतानेच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यामुळे मोदींना मणिपूरला जाता आले नसले तरी बांगलादेशला जावे किंवा तेथे होणारे हिंदूंवरील हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असा आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवले असे भाजपचे नेते म्हणत होते. आता त्यांनी बांगलादेशमध्ये सुद्धा युद्ध थांबवावे, अशा प्रकारची खोचक टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अमित शहा आणि मोदी हे मणिपूरला जाऊ शकले नाहीत. मात्र, ते बांगलादेशला जाणार असतील तर नक्की जावे, असा टोला देखील ठाकरे यांनी लगावला.
विश्वजीत कदम, विशाल पाटील ठाकरेंच्या भेटीला – सांगली लोकसभेत काँगे्रसने विशाल पाटील यांचे काम केल्याने उद्धव ठाकरे नाराज आहेत. असे असतांना अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर खासदार विशाल पाटील यांनी देखील बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत विश्वजीत कदम हे देखील होते. सांगली विधानसभेच्या निवडणुकीत देखील आता विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील असा दावा केला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीत देखील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS