श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेली कमवा व शिका योजना तसेच संस्थेत लाभलेले प्रा. भगवान
श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेली कमवा व शिका योजना तसेच संस्थेत लाभलेले प्रा. भगवान पाटील, डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. नलिनी महाडिक इत्यादी मराठी गुरुवर्यामुळे माझे शिक्षण झाले, अॅड. रावसाहेब शिंदे यांच्यामुळे प्राध्यापक होता आले, जीवनात भेटलेली अनेक देवमाणसं हीच माझी जीवनप्रेरणा असल्याचे मत प्रा. विलासराव शिवाजी तुळे यांनी व्यक्त केले.
येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. विलासराव तुळे यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोखाडा येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रा. तुळे बोलत होते. प्राचार्य अर्जुन शेळके अधक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विभाग प्रमुख प्रा. बंडू विठ्ठल शिर्के होते. कर्मवीर अण्णा व रयतमाऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन झाले. स्वागत, प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक कृष्णा जगदाळे यांनी केले. यावेळी शाखेतर्फे प्रा. तुळे आणि सौ. कुंदा तुळे यांचा सत्कार करण्यात आला. मंचर येथील विद्यार्थिनी शीतल गाढे, निलेश घोडेकर, जमीर शेख, मोखाड्याचे पत्रकार विलासराव पाटील, कमळाकर झिंजुर्डे, बाळासाहेब घाणे, कमलताई घाणे इत्यादिंनी तुळे दांपत्यांचा सत्कार केला. प्रा. विलासराव तुळे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, माझा जन्म 07 जुलै 1966 रोजी झाला.माझे प्राथमिक शिक्षण काठापूर गावी झाले. आईवडील यांनी कुंभारकाम करीत मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत माझे शिक्षण केले. सातारा येथे बहीण मीरा शिवाजी सासवडकर यांनी आधार दिला. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये कमवा व शिका योजनेत भाग घेतला, संस्थेचे सचिव प्राचार्य जे. जी. जाधव, मराठी विषयाचे प्रा. भगवान पाटील, प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्यामुळे अनेक कामात सहभागी होता आले. प्राचार्य अर्जुन शेळके यांनी प्रा. तुळे हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असल्याने आदिवासी भागात त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श निर्माण केला असे गौरवोद्गार काढले. शीतल गाढे, जमीर शेख, अधिक्षक बळीराम पोळ, संजय देवरे, तुकाराम लोंढे, कृषी अधिकारी सोनाली केमदारणे, गंगाराम चव्हाण इत्यादीसह विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कुंदा तुळे, चेतन तुळे, सुजाता तुळे, शिक्षक,शिक्षकेतर , विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याधापक कृष्णा जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. धनाजी शिंदे यांनी आभार मानले.
COMMENTS