Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी विधानसभा डॉ. सुजय विखे लढणार ?

देवळाली प्रवरा ः श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ राखीव असल्याने संगमनेर व राहुरी हा पर्याय आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले व सत्यज

पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्माण  करणार : डॉ. खा. सुजय विखे
पंतप्रधान मोदींचा विकासाचा अश्‍वमेध कुणी रोखू शकणार नाही
ग्रामस्थांनी रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात खासदारांची अडवली गाडी

देवळाली प्रवरा ः श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ राखीव असल्याने संगमनेर व राहुरी हा पर्याय आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले व सत्यजित कदम असा वाद सुटत नसेल तर मी आहे असे सूचक वक्तव्य माजी खा. सुजय विखे यांनी केल्याने कदम व कर्डीले यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली आहे.
                 गुरवारी माजी खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की मला आता भरपुर वेळ आहे. शेजारी कुठे संधी मिळाली तर विधानसभा लढविण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या तालुक्यात उमेदवारी बाबत समन्वय होणार नसेल अशा मतदार संघात माझ्या नावावर एकमत झाल्यास मी निश्‍चित निवडणूक लढविण्यास तयार आहे. श्रीरामपूर राखीव असल्याने संगमनेर आणि राहुरी हाच माझ्यासमोर पर्याय असल्याचे सूचक वक्तव्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले. डॉ. सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या दौर्‍याबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या. राहुरीत शिवाजीराव कर्डिले आहेत. मागील विधानसभेच्यावेळी सत्यजित कदम यांचे ऐनवेळी तिकीट कापले गेले असले तरी या विधानसभा निवडणूकीत विधानसभा लढविण्याचा मानस आहे. हे वृत्तपत्रांतील वृत्ता वरुन समजले कदम व कर्डीले या दोघांत जर वाद सुटत नसेल तर मी आहे असे सूचक वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभेकडे लक्ष केंद्रीत केल्याने राहुरी मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा मानस त्यांनी बोलवून दाखविला असल्याने कदम व कर्डीले यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS