Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकल मराठा समाज साधतोय राजकीय नेत्यांच्या प्रत्यक्ष भेटी

सरकारची व विरोधकांची दुटप्पी भुमिका नको

नाशिक प्रतिनिधी - मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारपासून (दि.३०) न

तृतीयपंथी मतदारांनी घेतली 100 टक्के मतदानाची शपथ 
कुरूक्षेत्रात स्थापणार जगातील सर्वात मोठी गीता
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली

नाशिक प्रतिनिधी – मराठा आरक्षणाबाबत राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भूमिका जाणून घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारपासून (दि.३०) नेत्यांच्या भेटीगाठीस सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची शिष्टमंडळाने मुंबई येथे भेट घेऊन मराठा समाजाला ‘ओबीसी’मधून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे. तसेच सगेसोयरे कायद्याची संवैधानिक अंमलबजावणी याविषयीची स्वतःची व पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, याबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी पटोले यांनी, जातीय जनगणना करा, ५० टक्क्यांची मर्यादा उठवा, त्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण द्या. तसेच राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असे सांगितले. मात्र, कोणता निर्णय घ्यावा याबाबतचा स्पष्टपणे खुलासा त्यांनी बैठकीत केला नाही. उलट ५० टक्क्यांच्या आत ‘ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीवर त्यांनी एक शब्दही उच्चारला नसल्याचे सकल मराठा समाजाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, शिवा तेलंग, विजय वाहुळे, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, किरण डोके, सुभाष गायकर, नितीन शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, येत्या काळात आमदार, खासदार ते राज्यस्तरीय नेत्यांच्या गाठीभेठी घेतल्या जाणार आहेत.

यावेळी निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर, शिवा तेलंग, विजय वाहुळे, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, किरण डोके, सुभाष गायकर, नितीन शिंदे, गणेश माने, हर्षद भोसले, नाना पालखेडे, गोरख संत, वैभव दळवी, जयेश मोरे, राजाभाऊ खरात, दिनेश कवडे, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कोटकर, दादासाहेब जोगदंड आदी उपस्थित होते.

सर्व राजकीय पक्ष एकमेकांकडे बोट दाखवून मराठा आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेत आहेत. आम्ही सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व राजकीय पक्षनेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या प्रमुख लोकांना प्रश्न विचारत आहोत. त्यांना भेटून नंतर या सर्वांची मतं समाजासमोर मांडणार आहोत. कोणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही हे समाजासमोर आम्ही उघड करणार आहोत. काँग्रेस पक्षाची ५० टक्क्यांच्या आत आरक्षणाला विरोधाची भूमिका आहे. मराठा आरक्षणविरोधी चेहरे समाजासमोर आणून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. – करण गायकर राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

COMMENTS