Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर गावात डास प्रतिबंधक फवारणीस सुरुवात

बेलापूर प्रतिनिधी : सध्या पावसाळा सुरु असल्याने डासांचा व त्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याला प्रतिंबध म्हणून बेलापूर-ऐनतपूर गाव तस

समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन
गोदावरी उजव्या-डाव्या कालव्यांचे काम प्रगतीपथावर – आ. आशुतोष काळे
घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग

बेलापूर प्रतिनिधी : सध्या पावसाळा सुरु असल्याने डासांचा व त्यामुळे विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याला प्रतिंबध म्हणून बेलापूर-ऐनतपूर गाव तसेच वाड्या वस्त्यांवर डास प्रतिबंधक किटकनाशकांच्या फवारणीला सुरुवात करण्यात आली.                                                                          
यासंदर्भात माहिती देताना सरपंच स्वाती अमोलिक व उपसरपंच मुश्ताक शेख यांनी सांगितले की, सध्या तालूक्यात सगळीकडेच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.डासांमुळे डेंग्यु, थंडीताप आशा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे ध्यानात घेवून ग्रामपंचायतीने तातडीने किटकनाशक फवारणीची मोहिम जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली हाती घेतली आहे.                                           सदर फवारणीचा शुभारंभ दिलिप दायमा यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच मुस्ताक शेख, पत्रकार दिलीप दायमा, अँड. अरविंद साळवी, अभिषेक नवले, गावकरी पतसंस्थेचे संचालक अजिज शेख, दादासाहेब कुताळ, बाबुराव पवार, सुधीर तेलोरे, जाकीर शेख, पिंटू गायकवाड आदीसह नागरिक, ग्रामपंचायत स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS