Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहराचा पाणीपुरवठा 4 दिवसाआड पूर्ववत करावा

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची नगरपालिकेकडे मागणी

कोपरगाव शहर ः एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र  ऑगस्ट महिना जवळ आला,  तरी  कोपरगाव शहराला पि

जागतिक आदिवासी दिन कल्याणमध्ये उत्साहात
मनपा व जिल्हा प्रशासनाने केली नगरच्या ओबीसींची अक्षम्य परवड ; दुपारी सुरू झाला सूचना संकलन कक्ष
‘कृष्णप्रिया’ संस्थेचे बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात

कोपरगाव शहर ः एकीकडे कोपरगाव शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीला पुर आल्याचे दिसत आहे व दुसरीकडे मात्र  ऑगस्ट महिना जवळ आला,  तरी  कोपरगाव शहराला पिण्यासाठी 12 दिवसा आड पाणी मिळत. धरण भागात पाऊस झाल्याने गोदावरी नदीला व नांदूर मधमेश्‍वर मधून कॅनलला पाणी सोडले आहे. त्यामुळे नगरपालिकेने 4 दिवसाआड म्हणजे 5 व्या दिवशी पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत करावा जेणेकरून महिला भगिनींना नागरिकांना झालेल्या पाण्याच्या त्रास थांबेल अशी मागणी कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन महिन्यापासून साधारण नागरिकांना गडूळ दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यासाठी येत होते. त्यामुळे  नगरपालिकेने शहरात असणारे फिल्टरेशन प्लांट-पाणी शुद्धीकरण केंद्र यावर लक्ष ठेवून पाणी स्वच्छ नागरिकांना पुरवावे. जेणेकरून पावसाळ्यात होणारे पाण्यामुळेचे आजार हे होणार नाही, याची काळजी ही नगरपालिकेने प्रशासनाने घ्यावी. नगरपालिकेने पाणी दिवस अचानक पणे वाढवायची वेळ येऊ नये यासाठी लक्ष ठेवून सातत्याने चार दिवस आड कसा पाणीपुरवठा कायमस्वरूपी राहील याची काळजी घ्यावी अशी विनंती पाटील यांनी केली आहे.

COMMENTS