Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील भाजप पदाधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील भाजप पदाधिकार्‍याच्या विरोधात पनवेलमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल येथील एका ऑर्केस्ट्रामध्ये 2 जणांना मार

आ.सतीश चव्हाण ‘यूपीएससीत’ यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांच्या भेटीला
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गीता परिवाराला 14 सुवर्ण
अंजनेरी गडावरील 10 पर्यटकांची सुटका

पुणे : पुण्यातील भाजप पदाधिकार्‍याच्या विरोधात पनवेलमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पनवेल येथील एका ऑर्केस्ट्रामध्ये 2 जणांना मारहाण केल्यामुळे भाजप पदाधिकार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाचताना वाद झाल्यानंतर भाजप पदाधिकारी यांनी धक्का मारून खाली पाडले आणि मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे.
ज्या तरुणांना मारहाण त्यांच्या अंगावर असलेले सोने देखील लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गणेश गीते यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे दोघे ही ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. अशी माहिती समोर आली आहे. 20 जुलै रोजी फिर्यादी आणि त्यांचा मित्र पनवेल मधील एका ऑर्केस्ट्रामध्ये गेले होते. त्या ठिकाणी आरोपी आणि त्यांचे मित्र सुद्धा त्या ठिकाणी उपस्थितीत होते. दरम्यान, मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास नाचत असताना आरोपी यांनी फिर्यादींना मुद्दाम धक्का दिला. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून असल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे दोघे ही ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. 20 जुलै रोजी फिर्यादी आणि त्यांचा मित्र पनवेल मधील एका ऑर्केस्ट्रामध्ये गेले होते. त्या ठिकाणी आरोपी आणि त्यांचे मित्र देखील उपस्थितीत होते. मध्यरात्री नाचत असताना आरोपी यांनी फिर्यादी यांना मुद्दाम धक्का दिला. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिस्कवली असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS