Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र चिखलांचे साम्राज्य

स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर शुुक्रवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसून य

’मित्रा’साठी सरकारी तिजोरीतून उधळपट्टी
सामाजिक सलोखा बिघडवणारे ते कोण ?
धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करणार

पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढल्यानंतर शुुक्रवारी पावसाचा जोर ओसरला असला तरी, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलाची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल व घाणीचे साम्राज्य पसरले. याची दखल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. पुण्यातील पुरबाधित परिसरात घरांमधील चिखल, गाळ व कचरा तातडीने साफ करण्यात यावा. या साठी महापालिका तसेच साफसफाई करणार्‍या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.या सोबतच शेतीचे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे हे तातडीने करण्यात यावे असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना केल्या आहेत.
सिंहगड परिसरातील काही सोसायट्या व घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे चिखल व गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे याभागातील रहिवाशांचे आरोग्य सध्या धोक्यात आले आहे. पुण्यात साथ रोग वाढले असल्याने तसेच घाण पाण्यामुळे इतर आजार पसरू नये यासाठी त्वरित स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ करण्यात यावा असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने देखील याची दखल घेतली असून डीप क्लीन मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घ्यावी. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी 500 स्वच्छता कर्मचारी व बीव्हीजी कंपनी 100 सफाई कर्मचारी या परिसरात स्वच्छतेच्या कामासाठी उपलब्ध करून दिले आहे. या कर्मचार्‍यांचा माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे. पुराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

COMMENTS