Homeताज्या बातम्यादेश

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सावत्र वागणूक

राज्यातील विरोधी खासदारांचे राजधानीत आंदोलन

नवी दिल्ली ः महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, महाराष्ट्राच्या वाट्याला भरीव अशी तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र यंदा

बारावीचा निकाल उद्या लागणार
देशभरात महिला अत्याचारात 30 टक्के वाढ
मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वार जखमी.

नवी दिल्ली ः महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, महाराष्ट्राच्या वाट्याला भरीव अशी तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव अशी तरतूद न केल्यामुळे महाराष्ट्रातील विरोधक खासदारांनी मंगळवारी राजधानीत आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या पायर्‍यावर आंदोलन केले.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली अशी टीका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेश या दोन राज्यांसाठी विशेष तरतूद करत त्यांच्यावर निधीची अक्षरक्षः उधळण केली, मात्र महाराष्ट्रासाठी विशेष काहीच तरतूद न करण्यात आल्यामुळे, तसेच मुंबईसाठी देखील काहीच तरतूद न करण्यात आल्यामुळे विरोधक खासदार आक्रमक झाले आहेत.  यावरुन संतप्त झालेल्या महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत आंदोलन करत मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शोभा बाच्छाव, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर, प्रियंका चतुर्वेदी आदी नेते यावेळी उपस्थित होते. संसदेच्या बाहेर वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. गद्दारी करूनही महाराष्ट्रातल्या नेत्यांना झुकते माप दिले जाते हे या देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लक्षात आले आहे. सत्ताधारी खासदार महाराष्ट्रासाठी काही आणू शकत नसतील तर या प्रत्येकाने राजीनामे दिले पाहिजे अशी महाविकास आघाडीची मागणी आहे’’, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच आता लाडका मित्र अशी नवीन योजना काढली आहे. आजही अर्थसंकल्पात मित्रांना खुश करण्याचे काम झालेले आहे असे त्या म्हणाल्या. दरम्यान, बिहार आणि आंध्रप्रदेशसाठी अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त 15 हजार कोटी देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. तर बिहारमध्ये एक्सप्रेस वे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. इतकंच नाहीतर बिहारमध्ये औद्योगिक विकास करण्यावर आमचा भर असून बिहारमध्ये रस्ते बांधणीवर भर देण्यात येणार आहे. यावरूनच विरोधक आक्रमक झाले आहेत.

केंद्र सरकारची महाराष्ट्राप्रती सूडबुद्धी ः प्रा. वर्षा गायकवाड – देशातील सर्वाधिक कर महाराष्ट्र आणि मुंबईमधून मिळतो. कराच्या बाबतीत देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि मुंबई सर्वोच्च स्थानावर आहे. मात्र तरीही महाराष्ट्राला काहीही देण्यात आलेले आहे. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाचा आम्ही मोठ्या प्रमाणात निषेध करतो. केंद्राची महाराष्ट्राच्या प्रती सूडबुद्धी आहे. यापूर्वीच केंद्राने पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा गलिच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला ठेंगा ! ः  वडेट्टीवार – विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून बजेटमध्ये या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले-ठेंगा, देशात सगळ्यात जास्त कर देणार्‍या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे आज पुन्हा सिद्ध झाल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

COMMENTS