कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपायामुळे संपूर्ण देशात आणि जागतिक पातळीवर नाव मिळविलेल्या मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या आजारावरील उपचार आणि नियोजनापुरती मर्यादित न राहता त्यांनी कोरोनाच्या संदर्भात संशोधन अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपायामुळे संपूर्ण देशात आणि जागतिक पातळीवर नाव मिळविलेल्या मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या आजारावरील उपचार आणि नियोजनापुरती मर्यादित न राहता त्यांनी कोरोनाच्या संदर्भात संशोधन अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुबंईच्या हद्दीत असणार्या मोठ्या प्रमाणात गर्दी असण्यार्या वॉर्डमधील रुग्णसंख्या कमी कशी? या विषयावर संशोधन आणि अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका त्याच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयाची आणि आरोग्य विभागाची मदत घेऊन हा अभ्यास करणार आहे.
नेमक्या चुका काय किंवा आपण कुठे कमी पडत आहोत का? व्यवस्थापन नियोजनात आणखी काही सुधारणा करायची गरज आहे का? या आणि अशा विविध गोष्टीचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अशाच पद्धतीने अभ्यासासाठी निरनिराळे विषय शोधले असून त्याकरिता ते मुंबई विद्यापीठ, आयआयटी मुंबई आणि विविध खासगी शैक्षणिक संस्था यांच्यासोबत बोलणी करून अभ्यास संशोधन करून घेणार आहेत. या अशा पद्धतीने अभ्यास करणारी मुंबई महानगरपालिका पहिली महापालिका असण्याची आहे. कोरोनाचा आजार हा तात्काळ जाणारा आजार नाही. काही वैद्यकीय तंज्ञानी कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे देश आणि राज्य पातळीवरील आरोग्य विभाग त्या अनुषंगाने पूर्व तयारी करून ठेवत आहेत. या अशाच परिस्थिती उपचारांसोबत आणि व्यस्थापनासोबत या विषयावर अधिक अभ्यास होण्याच्या दृष्टीने संशोधन करून महापालिका आणखी कोणत्या नवीन गोष्टी करण्याची गरज आहे, त्याचा शोध घेणार आहे.
संपूर्ण देशात मुंबई शहरांत कोरोनाचे रुग्ण अधिक होते. त्यामुळे मुंबई शहर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट झाले होते; मात्र योग्य उपाययोजनांमुळे महापालिकेने वाढती रुग्णसंख्या रोखण्यात यश मिळविले आहे. याप्रकरणी, मुबंई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त्त सुरेश काकाणी यांनी सांगतिले, की मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्डनिहाय कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या पाहत असताना असे लक्षात आले, की असे चार वॉर्ड आहेत तेथे लोकवस्ती दाटीवाटीच्या असून गर्दीचा मोठा परिसर ह्या वॉर्डात आहे; मात्र प्रतिलाख लोकसंख्यामागे तेथील कोरोबाधितांची संख्या कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये बी वॉर्ड (डोंगरी, भेंडी बाजार), सी वॉर्ड (गिरगाव), एम पूर्व (देवनार, गोवंडी), एल वॉर्ड (कुर्ला,चेंबूर) या वॉर्डात ही संख्या कमी का आहे? यामागची काही कारणे आहेत का? ती संशोधन अभ्यासातून शोधून काढणार आहेत. कारण सगळ्या वॉर्डात अशाच पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत होत्या. या अभ्यासातून आणखी काही नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे का? कोरोनाचे उपचार आणि नियोजन याच्यापलीकडे बघण्याची गरज आहे त्याकरिता हा संशोधन अभ्यास करण्यात येणार आहे. या परिसरातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला होता का? की आणखी काही कारण आहे याचा शास्त्राच्या आधारावर अभ्यास करण्यात येणार आहे.
या अशा संशोधन अभ्यासातून कशा पद्धतीने आणखी नियोजन करावे लागणार आहे. कोणत्या उपाययोजना आहे, ज्यामध्ये बदल करावे लागणार आहेत किंवा नवीन सुधारणा करण्याची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टीची या अभ्यासातून माहिती मिळणार आहे.
COMMENTS