Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहित्यसखी’द्वारा निफाड आश्रमशाळेत गुरुपोर्णिमा साजरी

नाशिक- नाशिक येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचद्वारा गुरुपौर्णिमेनिमित कवयित्री संमेलन व ग्रंथभेट कार्यक्रम निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी

मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न
परिणीती चोप्रानंतर आता कंगना रनौत अडकणार विवाह बंधनात ?
म्युकरमायकोसिसची औषधे कोठूनही मागवा l पहा LokNews24

नाशिक– नाशिक येथील साहित्यसखी महिला साहित्यिक मंचद्वारा गुरुपौर्णिमेनिमित कवयित्री संमेलन व ग्रंथभेट कार्यक्रम निफाड येथील मातोश्री जसोदाबाई सोनी आश्रमशाळेत करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ शेलार, साहित्यसखी मंचच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा जाधव,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुमती पवार ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. सुमती पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, शिक्षणाच्या जोरावर आयुष्यात उत्तम काही करून दाखवावे, जिद्द असावी. मार्गात अडचणी,संकटे तर येतातच पण आव्हानं आहेत म्हणून तर जगण्यात मजा आहे हे विसरता कामा नये. संघर्ष करत आपले ध्येय सिद्ध करायला शिका.”  तसेच उपस्थितांशी संवाद साधताना राजाभाऊ शेलार म्हणाले कि, ‘आपल्या शरीरात रोज ऊर्जा निर्माण होत असते ती वापरली नाही तर व्यर्थ जाते. त्यामुळे ह्या उर्जेचा विनियोग रोज काहीतरी चांगले काम करण्यात झालाच पाहिजे असा आपला दिनक्रम असला पाहिजे. नाहीतर आला दिवस-वेळ आणि उर्जा व्यर्थ जाते. गेलेली वेळ परत येत नाही. शिक्षणाबरोबरच शिक्षकाने विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या गुण, कौशल्यास वाव दिला पाहिजे. तेव्हाच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होईल.’  

       ह्या काव्यसंमेलनात आरती डिंगोरे, सुमती टापसे, रंजना बोरा, प्रीती गायकवाड, सुजाता येवले,शुभांगी भोकरे, मनीषा पोतदार,सुनंदा पाटील यांनी आपल्या बालकवितांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले, विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले. दीड तास मुले हसतखेळत उत्साहात कविता ऐकत व गात होते. सहभागी सर्व कवयित्रींचा सत्कार संस्थेतर्फे राजाभाऊ शेलार यांनी केला सोबतच झाडांची रोपे भेट म्हणून दिली तर साहित्यसखीतर्फे प्रा.सुमती पवार यांनी अध्यक्ष राजाभाऊ शेलार व सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा ढेपले यांचा सत्कार केला. यावेळी आश्रमशाळेतील ग्रंथालयासाठी एकूण ८५ ग्रंथांची भेट साहित्यसखी महिला साहित्यिक मंचने दिली. विद्यार्थ्यांना खाऊ, कपडे वाटपही करण्यात आले.

        काव्यसंमेलनात मुलांसाठी संस्कारक्षम ,गमतीशीर, मूल्यांची रुजवण करणाऱ्या कविता सहभागी कवयित्रींनी सादर केल्या.विद्यार्थ्यांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक नितीन कडलग, अधिक्षिका वंदना बोरसे, अधीक्षक ज्ञानेश्वर जाधव, अधिक्षिका वंदना बोरसे, दिलीप आहिरे, झुंबर आव्हाड यांनी परिश्रम घेतले. मोठया संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप आदिवासी पावरी सामुहिक नृत्याने झाला. अशाप्रकारे ‘साहित्यसखी’ द्वारा आगळीवेगळी गुरुपोर्णिमा बालकांच्या सान्निध्यात आदिवासी आश्रमशाळेत साजरी करण्यात आली.

COMMENTS