Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपूरात पावसाचा हाहाकार

मामा तलाव फुटल्याने 300 घरात शिरले पाणी

चंद्रपूर : विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असतांनाच रविवारी चंद्रपुरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे. चंद्

जिल्ह्यातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
बारामतीमध्ये धनगर समाजाचे आंदोलन
तलाठ्याच्या चुकीमुळे वृध्द निराधार महिलेचे झाले पैसे बंद

चंद्रपूर : विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असतांनाच रविवारी चंद्रपुरात देखील जोरदार पाऊस कोसळत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 600 हून अधिक घरांची पडझड झाली असून शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर चंद्रपूर पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चीचपल्ली गावात रविवारी सकाळच्या सुमारास मामा तलाव फुटल्याने गावातील 300 घरात पाणी शिरले आहे.
ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून नागभीड-नागपूर महामार्ग पुराच्या पाण्यामध्ये बंद पडला होता. तसेच अनेक गावं, वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्तेही नदी, नाल्यांना पूर आल्याने बंद पडले होते. पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतर हे मार्ग सुरू झाले. संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे 300 घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. घरं आणि शेतीच्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. मुसळधार पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जामखूर्द येथे घराची भिंत कोसळून पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS