Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमुकल्यांच्या वारीसाठी आ. थोरातांचा ताफा थांबतो तेव्हा.

संगमनेर ः वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात आपल्या सुदर्शन निवासस्थानापासून कारखान्याकडे जात असताना अचानक घुलेवाडी फाट

समन्यायी कायद्याबाबत आम्ही भांडत होतो तेव्हा ‘ते’ का गप्प होते – ना.थोरात
बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर
दिंडीतील मृत वारकर्‍यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये

संगमनेर ः वारकरी संप्रदायाचे पाईक असलेले लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात आपल्या सुदर्शन निवासस्थानापासून कारखान्याकडे जात असताना अचानक घुलेवाडी फाट्यावर रस्त्यात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः रस्त्यावर येऊन या बालगोपाळ चिमुकल्यांच्या दिंडीला वाट काढून दिली.
घुलेवाडी फाटा येथे समोरून आनंदवन शाळेतील बालगोपाळांची विठ्ठल नामाचा गजर करत दिंडी घुलेवाडी गावाकडे जात होती. दिंडीतील विविध वेशभूषा केलेल्या बालकांनी काँग्रेस नेते आमदार थोरात यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे साहेबांनी गाडीतून खाली उतरत या बालगोपाळांशी प्रेमाने संवाद साधत त्यांच्यासोबत एकत्रित छायाचित्रे घेतली. त्यामुळे बालगोपाळही साहेबांसोबत काही काळ हरखून गेले होते. घुलेवाडी फाट्यावरून नाशिक-पुणे मार्गाने ये-जा करणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाहनांचा बालगोपाळांच्या दिंडीला अडथळा होऊ नये यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार थोरात यांनी स्वतः रस्त्यावर उभे राहून विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यास मदत केली. महाराष्ट्रात आषाढी वारीला एक सांस्कृतिक परंपरा आहे. वारी निमित्त अनेक दिंड्या पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जात असतानाच गावागावातील शाळांमधून देखील विठ्ठल, रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर यांच्यासह विविध साधू संतांसह महापुरुषांच्या वेशभूषा केलेल्या बालगोपाळांच्या दिंड्या विठ्ठल नामाचा गजर करत निघत असतात. राज्यातील सांस्कृतिक परंपरेचे हे एक आदर्श उदाहरण ठरते. या माध्यमातून समाजात वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार होताना दिसतो. आमदार बाळासाहेब थोरात हे देखील या सुसंस्कृत व पुरोगामी विचारांचे पाईक असून वारकरी संप्रदायाला मानणारे आहे. विठ्ठल हे संपूर्ण देशाचेच आराध्य दैवत असून आषाढी एकादशीनिमित्त निघणार्‍या बालगोपालांच्या या संत स्वरूपातील वेशभूषा सर्वांनाच अध्यात्माची वेड लावतात. आमदार बाळासाहेब थोरात यांनाही या बालगोपालांनी भुरळ पाडली. व कामात व्यस्त असतानाही थोडा वेळ थांबावयास लावले. खरे तर आमदार थोरात तालुक्यातील लहान थोरापासून ते वृद्धांची कुटुंबप्रमुखासारखी काळजी घेत असतात. त्यांच्या सुख-दुःखात सामील होत असतात. त्याचाच प्रत्यय या बालगोपाळांसह संगमनेर तालुक्यातील प्रत्येकाला आला. 

COMMENTS