Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात झिका रूग्णांची संख्या 28 वर

पुणे : पुणे शहर परिसरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. प

लोककलावंत शांताबाई लोंढे यांचा 5 लाख देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मंदिर रिकामे, कोविड सेंटर फुल्ल!
सीबीएसस्सीच्या दहावीच्या परीक्षा रद्द ; बारावीच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : पुणे शहर परिसरात झिका व्हायरसच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शहरात झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. झिका व्हायरसचे रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे रूग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात झिका व्हायरसचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये देखील झिका व्हायरसचे रूग्ण आढळले आहेत. झिका व्हायरसचा जास्त प्रमाणात धोका गर्भवती स्त्रियांना आहे. मुदतपूर्व प्रसूतीची देखील शक्यता वर्तविली जात आहे. झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे.

घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचे आवाहन झिका आणि डेंग्युच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आले आहे. झिका व्हायरसचा धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे. झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या. डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा. संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. कापूराचा वापर करून तुम्ही 15 ते 20 मिनिटात डासांना दूर पळवू शकता. कडुलिंब आणि नारळाचे तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS