शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र 24 तास
शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र 24 तासात 13 मिलिमीटर पाऊसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. धरणाची पाणी पातळी खालावल्याने येथील वीजनिर्मिती बंद होती. पण आठ दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत चार मीटरने वाढ झाली आणि काही काळ बंद असणारी वीजनिर्मिती पुन्हा सुरू झाली आहे. आज रोजी धरणात 20.98 टीएमसी पाणीसाठा झाल्याने बंद असणारी वीजनिर्मिती आज पुन्हा सुरू झाली असून एक जनित्र सुरू करण्यात आले आहे. एकूण 1660 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात होत आहे.
धरणाच्या पाण्यावर चांदोली जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. येथे आठ मेगावॅट क्षमतेची दोन जनित्रे असून याठिकाणी 16 मेगावॅट वीजनिर्मिती होते. गतवर्षी पाच वर्षातील उच्चांकी वीजनिर्मिती झाली होती. धरणाची पाणी पातळी कमी झाल्याने ही वीजनिर्मिती बंद होती. आजपासून ती पुन्हा सुरू झाली आहे. धरणात सध्या 60.96 टक्के पाणीसाठा असून धरणाची पाणीपातळी 611.55 मीटर आहे. आजअखेर धरण परिसरात 1196 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षीचा हा जास्त पाऊस आहे. सध्या धरणातील पाणीसाठा समाधानकारक असून धरणाची पाणी पातळी 611.55 मीटर झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात 5 हजार 804 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी चार दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
COMMENTS