पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर अमरावती, नाशिक , लातूर व कोकण
पुणे ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर अमरावती, नाशिक , लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात येणारी दहावीची पुरवणी परीक्षा 16 ते 30 जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. तर बारावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
राज्यात सदर परीक्षेसाठी दहावी करिता एकूण 28 हजार 976 मुला व मुलींनी पुरवणी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यात 20 हजार 370 विद्यार्थी व 8 हजार 605 विद्यार्थींनींचा समावेश असून एक तृतीयपंथी देखील आहे. तर, बारावीचे परीक्षेकरिता राज्यात पुरवणी परीक्षेस 56 हजार 845 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 36 हजार 590 मुले व 20 हजार 250 मुली यांच्यासह 5 तृतीयपंथीचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेले वेळापत्रकच विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये. सकाळच्या सत्रात परीक्षेस 10.30 वाजता तर दुपारच्या सुत्रात 2.30 वाजता परीक्षार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित रहावे. सकाळच्या सत्रात 11 वाजता व दुपार सुत्रात 3 वाजता परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकांचे वितरण होईल.
COMMENTS