Homeताज्या बातम्याविदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

कानावर लागली गोळी ; सुरक्षारक्षकांनी शूटरला केले ठार

वॉशिंग्टन ः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीदरम्यान संबोधित करत असताना त्यांच्यावर अज्ञात

अन्यायाचा इव्हेंट किती दिवस ?
नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा सुरू होण्याआधी फिंचने घेतली निवृत्ती

वॉशिंग्टन ः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीदरम्यान संबोधित करत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. यानंतर त्यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी त्याला स्टेजवरून बाहेर नेले. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने सुरक्षा दलाने वेढलेल्या मंचावरून त्यांना बाहेर नेले जात असतांना त्यांच्या उजव्या कानाभोवती रक्त दिसत होते. डोनाल्ड ट्रम्प सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उभे राहण्यास मदत केली तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर आणि कानावर रक्त दिसत होते. यावेळी ट्रम्प यांनी आपली मुठ घट्ट धरली आणि ती हवेत हलवली. त्यानंतर गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवून कारच्या मदतीने रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. या घटनेविषयी ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, मला कानाजवळ एक आवाज जाणवला, त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याची बाब लगेच माझ्या लक्षात आली. खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर काय घडले ते कळाले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. माजी राष्ट्रपती सुरक्षित असल्याचे गुप्तहेर खात्याने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. गोळीबाराचा आवाज येताच त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सुरक्षा एजन्सींचे आभार मानले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांना हल्लेखोर शूटर दिसताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या एका स्नायपरने लांब अंतरावर असणार्‍या हल्लेखोराला ठार मारले. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हल्ला करणारा थॉमस क्रूक्स – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला करणारा थॉमस कू्रक्स हा 20 वर्षांचा आहे. त्याचा जन्म सप्टेंबर 2003 मध्ये झाला होता.बटलरपासून 40 किमी अंतरावर बेथल पार्कमध्ये त्याचे घर आहे. क्रुक्स रिपब्लिकन पक्षाशी संबंधित होता. त्याने 2021 मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित गटालाही देणगी दिली. क्रूक्सला 2022 मध्ये मॅथ्स-सायन्सशी संबंधित स्टार पुरस्कार मिळाला होता.

COMMENTS