Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध व्यवसायाविरोधात सुरू केलेल उपोषण आश्‍वासनानंतर स्थगित

बेलापूर ः बेलापूर व परिसरातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद असून ते व्यवसाय सुरु होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असे आश्‍वासन श्रीरामपूर शहर पोलि

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर राज्यात तिसरा
’सदगुरू’चा विद्यार्थी कृषी क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करेल : डॉ. शंकरराव नेवसे
कोपरगाव तालुक्यातील गावांसाठी 9 कोटी रुपये निधी मंजूर

बेलापूर ः बेलापूर व परिसरातील अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद असून ते व्यवसाय सुरु होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल असे आश्‍वासन श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिल्यानंतर भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आपले उपोषण स्थगित केले.          
बेलापूर व परिसरातील अवैध व्यवसाय बंद व्हावेत या मागणीसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे सचिव अल्ताफ शेख यांनी आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. अवैध व्यवसायामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत होते गावठी दारु मटका बिंगो जुगार गुटखा अवैध वाळु उपसा या मुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली होती, त्यामुळे हे सर्व व्यवसाय बंद करावेत या मागणीसाठी अल्ताफ शेख यांनी उपोषण सुरु केले होते. सर्वांच्या विनंतीवरुन व पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या अश्‍वासनानंतर उपोषण सोडण्यात आले. या वेळी बोलताना अल्ताफ शेख यांनी सांगितले की व्यसनाधिनतेमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे, त्यामुळे हे व्यवसाय कायमचे बंद व्हावेत या मागणीसाठी मी उपोषणास बसलो होतो, परंतु सर्व ग्रामस्था समक्ष पोलीस निरीक्षक देशमुख यांनी आश्‍वासन दिल्यामुळे हे उपोषण मी स्थगित करत आहे. जर हे व्यवसाय पुन्हा सुरु झाले तर मी पुन्हा उपोषणास बसेल असेही शेख यांनी सांगितले. या वेळी गावातील महीलांनी शेख यांनी समाजपयोगी कार्य हाती घेतले असुन दारु बंद झाली तर अनेकांचे संसार सुरळीत चालतील असे सांगितले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सुनिल मुथा बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे हाजी ईस्माईल शेख उपसरपंच मुस्ताक शेख भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर देविदास देसाई भाऊसाहेब तेलोरे मोहसीन सय्यद विजय शेलार विशाल आबेकर बाळासाहेब दाणी महेश कुर्हे ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक सुरेश अमोलीक राजु शेख जब्बार आतार शफीक आतार शफीक बागवान समीर जहागीरदार अब्रार सय्यद गोपी दाणी रफीक शहा समीर पठाण सचिन जाधव मोहसीन पठाण वसीम आतार आसिफ शेख अब्दुल शेख बिलाल बागवान आदी उपस्थित होते.

COMMENTS