Homeताज्या बातम्यादेश

केजरीवालांना सर्वोच्च अंतरिम जामीन मंजूर

मात्र सीबीआय खटल्यामुळे राहावे लागणार तुरूंगातच

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मंज

केजरीवालांना दिलासा नाहीच
केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर
देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय : केजरीवाल

नवी दिल्ली ः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र केजरीवाल सध्या सीबीआयच्या ताब्यात असल्यामुळे त्यांची तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे.
जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, केजरीवाल यांना 90 दिवस तुरुंगवास भोगावा लागला आहे. त्यांना अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे, असे आम्ही निर्देश देतो. आम्हाला माहिती आहे की ते निवडून आलेले नेते आहेत. ईडी प्रकरणात झालेली अटक योग्य की अयोग्य यावर न्यायालयाने निर्णय दिला असून न्यायालयाने हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची शिफारस केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतरही केजरीवाल मात्र, अद्याप तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही, कारण त्यांना सीबीआयने देखील अटक केली आहे. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत न्यायालयाने केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी केजरिवाल यांना जामीन मंजूर करत हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश दिले. सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जामिनाच्या प्रश्‍नावर पूर्णपणे विचार करण्यात आलेला नाही, परंतु पीएमएलच्या कलम 19 च्या नियमंचा विचार करण्यात आला आहे. कलम 19 आणि कलम 15 मधील फरक स्पष्ट करण्यात आला आहे. जोपर्यंत मोठे खंडपीठ निर्णय घेत नाही तोपर्यंत केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. निकाल देताना न्यायाधीशांनी असेही सांगितले की, केजरीवाल यांना 90 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले आहे.

COMMENTS