Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस

मुंबई ः मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. रुळावर पाणी साचल्याने मध्य र

कोपरगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी !
नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई ः मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली आहे. या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. दरम्यान, मुंबईसह परिसरात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग भरला. बॅरिकेड लावून भुयारी मार्ग बंद करण्यात आला. ठाणे, दादर, कल्याण आणि कुर्ला रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. ट्रेनची वाट पाहताना मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अगदी आठवडाभरापूर्वी मुंबईत सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील पूर्णत: विस्कळीत झाली होती.

COMMENTS