Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भेसळ बंद झाल्यास दुधाला 50 रुपये भाव मिळेल ः लांबे

रास्ता रोको आंदोलन म्हणजे भाषणबाजी व राजकीय स्टंट

देवळाली प्रवरा ः गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्य

बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये ; महावितरणचे आवाहन
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू l पहा LokNews24
मळेगावथडीत 1 कोटी 19 लाखाचे विकासकामे पूर्ण ः अनिता उगले

देवळाली प्रवरा ः गेल्या आठवड्यात दूध दरवाढ व इतर मागण्यांसाठी राहुरीत झालेले रास्ता रोको आंदोलन व भाषणबाजी हा निव्वळ राजकीय स्टंट असून, जखम डोक्याला व मलम गुढग्याला याप्रमाणे राजकीय नेते व कार्यकर्ते हे दूध भेसळीबाबत काहीच बोलले नाहीत, अशी टिका करीत दुधातील भेसळ थांबल्यास दुधाला प्रतिलिटर 50 रुपये भाव सहज मिळू शकेल, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी सांगितले.
              लांबे पुढे म्हणाले, शेतमालाच्या भावाबाबत आंदोलन करणार्‍यांना शेतकर्‍यांचे कुठलेही देणेघेणे नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा फक्त शेतकर्‍यांच्या मतासाठी राजकिय स्टंट आहे. सध्या कांद्याला 3 हजारापर्यत भाव आहे. सत्ता पक्षाने चालू अधिवेशनात दूधभाव व अनुदान जाहीर करुण नविन योजणा जाहीर केल्या तरी आंदोलन, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शेतकरी वर्ग कोरोना व अतिवृष्टी या कारणाने आर्थिक अडचणीत असताना ऊर्जा राज्यमंत्री यांनी शेतकर्‍यांची शेतीपंपाची चालू लाईट बंद करुन थकबाकीच्या नावाखाली सक्तीची विजबील वसुली करणारांनी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर नौटंकी आंदोलन करुण स्टंटबाजी करुण शेतकर्‍यांची दिशाभुल करु नये असा आरोप शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केला. पुढे लांबे म्हणाले, प्रस्थापित मंडळीच्याच नाकर्तेपणामुळेच शेतीधंदा धोक्यात आला आहे. अनेक वर्षापासून शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग दुग्ध व्यवसायाकडे वळाला. मात्र या व्यावसायालाही दूध भेसळ करणार्‍या महाभागांची दृष्ट लागली.काही बड्या नेते मंडळीच्या आशिर्वादानेच अनेक दुधभेसळखोर स्वहीतासाठी मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ करून निष्पाप नागरिकांसह लहान लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणले जात असताना यात खरा दूध उत्पादक नाहकच बदनाम झाला. या दूध तस्करांवर सरकारने व अन्न व औषध भेसळ विभागाने कठोर कारवाई करावी, त्यामुळे दूध अतिरीक्त होणार नाही, खर्‍या दूधउत्पादकाला 50 रुपयांपर्यत भाव मिळेल व आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होणार नाही, असा सूचक इशारा सत्तापक्षासह विरोधकांना शेतकरी नेते लांबे पाटील यांनी दिला.

COMMENTS