Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी झालेल्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांच

स्वाभिमानाचे प्रतीक ‘माझी माती, माझा देश’ अभियान
अहमदनगरचे नाव आता होणार अहिल्यानगर
सावरकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान ः मुख्यमंत्री शिंदे

मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी झालेल्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय धेतला आहे. या अंतर्गत 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46 वरुन 50 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचार्‍यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 या महिन्याच्या वेतनासोबत वाढीव महागाई भत्ता सरकारी कर्मचार्‍यांना देण्याबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे.
कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून आपल्या कर्मचार्‍यांसाठी घेतला जातो. त्यानंतर राज्य सरकारकडून राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी वाढीव भत्ता देण्याचा निर्णय घेतला जातो. प्रामुख्याने वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या म्हटल्याप्रमाणे कर्मचार्‍यांना वाढीव भत्ता हा 1 जुलैपासून लागू होणार आहे. सरकारी निम-सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी अशा सर्व कर्मचार्‍यांना हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा सहा महिन्यांच्या थकबाकीसह हा भत्ता मिळणार आहे. शासनाच्या आदेशानुसार, ही वाढ 1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 च्या वेतनाबरोबर रोखीने दिली दिली जाणार आहे. शासकीय व निमशासकीयसह जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. शेवटचा महागाई भत्त्यात वाढ यापूर्वी 23 नोव्हेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. यावेळी 42 वरून 46 टक्के महागाई भत्ता करण्यात आला होता. त्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्याचा वाढीव महागाई भत्ता नोव्हेंबरच्या वेतनात देण्यात आला होता. जानेवारीत महागाई भत्ता वाढला नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. त्यानुसार आता जानेवारीपासूनचा महागाई भत्ता जुलैच्या वेतनात राज्य सरकारी कर्मचार्‍यांना मिळणार आहे. दरम्यान, केंद्राने यापूर्वीच आपल्या कर्मचार्‍यांच्या भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

COMMENTS