Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील 7 रेल्वे स्थानकांची नावे बदलणार

नावे बदलण्याचा प्रस्ताव विधिमंडळात पारीत

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी मुंबई लोकल रेल्वे मार्गावरील 7 रेल्वे स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्

सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा | LOK News 24
चोरट्यांची देवाच्या दारी चोरी | LOKNews24
Pune : पुण्यात दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला सात जण जेरबंद l LokNews24

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी मुंबई लोकल रेल्वे मार्गावरील 7 रेल्वे स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्र विधीमंडळ पावसाळी अधिवेशनात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सादर केला, नावे बदलली जाणार्‍या स्थानकांमध्ये करी रोड, सँडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल आदिंचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेत मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील 7 स्टेशन्सचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील एनसीपीच्या महायुती सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. राज्याचे संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या द्वारे सादर केलेला प्रस्ताव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. मुंबई लोकल ट्रेन मार्गावरील अनेक स्टेशन्सची नावे इंग्रजी आहेत त्याचबरोबर ते वसाहतवादी वारसा दाखवतात, अशी तक्रार केली जाते. या प्रस्तावानुसार करी रोड स्टेशनचे नाव बदलून लालबाग, सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी, मरीन लाइन्सचे मुंबादेवी आणि चर्नी रोडचे नाव बदलून गिरगाव केले जाईल. सँडहर्स्ट रोड स्टेशनचे नाव सेंट्रल मार्गासोबतच हार्बर लाइनवरही बदलले जाईल. अन्य स्टेशन्समध्ये कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव बदलून काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे माझगाव आणि किंग सर्कलचे नाव तिर्थंकर पार्श्‍वनाथ केले जाईल. मुंबईमध्ये याआधीही अनेक स्टेशन्सची नावे बदलली गेली आहेत. जसे की, ऐतिहासिक स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलफिन्स्टन रोडचे नाव बदलून प्रभादेवी केले होते.

COMMENTS