Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात ऑगस्टपासून भुयारी मेट्रो होणार सुरू

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे ः पुण्यातील बहुप्रतिक्षेत असलेला मेट्रोचा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा 3.6 किलोमीटरचा भुयारी मार्ग ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार असून, यादरम

वकील संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब तांगडे यांचा सत्कार
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडली
संजय आनंदकर अ‍ॅकडमीच्या 12 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पुणे ः पुण्यातील बहुप्रतिक्षेत असलेला मेट्रोचा सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा 3.6 किलोमीटरचा भुयारी मार्ग ऑगस्टमध्ये सुरू करण्यात येणार असून, यादरम्यान मंडई स्टेशनचे काही काम शिल्लक असून ते स्टेशननंतर सुरू केले जाईल. कोथरूड ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली यादरम्यान मेट्रो विस्तारीकरण भविष्यात होईल. प्रस्तावित मेट्रो मार्गात हिंजवडी ते चांदणी चौक दरम्यान सर्वेक्षण करण्यासाठी सुचवण्यात आले आहे. बस आणि मेट्रोसाठी प्रवाशांना एकच तिकीट मोबाईलवर उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतांना राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील मनपा, मेट्रो, बस सेवा, रेल्वे याबाबत आढावा बैठक घेतली. विविध प्रश्‍न, प्रकल्प याबाबत माहिती घेतली गेली आहे. शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकर यांच्या सार्वजनिक व्यवस्था आढावा घेऊन विकास कामांना गती देण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुखकर करण्यासाठी वेगवेगळ्या बैठक घेण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 3638 बस गरज आहे पण त्यातील 1770 बस आणखी पाहिजे आहे त्याबाबत आढावा घेण्यात आला आहे. 177 इलेक्ट्रिक बस, 400 सीएनजी बस टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आगामी काळात डिझेल बस नको, याकरीता त्या सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येत आहे. यासाठी 226 अशा बस सीएनजी मध्ये बदल करण्यात येईल त्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च आहे. आगामी काळात मेट्रो मार्ग विस्तार करणार असेल तर डीपीआर मध्ये बस व्यवस्था कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे. अटल बस सेवा मार्फत ज्याठिकाणी गरज आहे त्याजागी बंद झालेली बससेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुणे ते लोणावळा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन सुरू करण्याबाबत काम थांबले होते त्यास गती देण्याचे काम करण्यात येईल.पुणे ते नगर, पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग काम सध्या सुरू आहे. पुणे ते दिल्ली मार्गावर वंदे भारत सेवसाठी चाचपणी करण्यात आली आहे. पुणे ते मिरज दरम्यान रेल्वे विद्युतीकरण काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

COMMENTS