Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराटे खेळामुळे आत्मविश्‍वास निर्माण होतो ः मुख्याधिकारी लोंढे

ब्लॅक बेल्ट परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

राहाता ः विस्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहमदनगर राहाता या अकॅडमीच्या वतीने 7 जुलै  रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या

शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांची ती ऑडिओ क्लिप व्हायरल | LokNews24
अहमदनगर मधील वकिलानेच कुत्र्यांच्या विरोधात खंडपीठात याचिका केली दाखल |
दलित पँथरने दिला डॉ. सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा

राहाता ः विस्टार मार्शल आर्ट कराटे असोसिएशन ऑफ इंडिया अहमदनगर राहाता या अकॅडमीच्या वतीने 7 जुलै  रोजी ब्लॅक बेल्ट परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती व कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी वैभव लोंढे, प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे पत्रकार,कमलाकर चौधरी,  पीएसआय, प्रमोद तोरणे, दिलीप खरात पत्रकार, मनोज गाडेकर पत्रकार, डॉ. शर्वरी कुलकर्णी, उद्योजक सार्थक भन्साळी, राजेंद्र कोहकडे, सारिका कासार, भानुदास गाडेकर, दिलीप दुशिंग, पत्रकार किरण वाबळे, पत्रकार धनंजय वाकचौरे, अनिल पावटे, विजय मोगले, समीर शेख, अनिल सोमवंशी, निलोफर शेख, भावना निमसे, श्रावणी निमसे, प्राची निमसे, अंजूम शहा, आशिष पायमोडे,  आधी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती मध्ये कार्यक्रमाची द्वीपप्रज्वलाने झाली दाखवली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ लोंढे म्हणाले की, शिवशंभू मर्दानी कला व क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे मर्दानी खेळाचे सर्व कलाकार यांची उत्तर प्रदेश सरकारने निवड केली होती. राम जन्मभूमी येथे महाराष्ट्राच्या मातीचा मर्दानी खेळाचे प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवण्यात आले होते अयोध्ये येथे अकरा राज्याचे विद्यार्थी आले होते. ही गोष्ट आपल्या गावासाठी खूप मुलांमध्ये प्रेरणा देणारे आहे. तर राहाता नगर परिषदेचे मुख्यअधिकारी लोंढे साहेब म्हणाले की हा मर्दानी खेळ कुठेतरी ठिकाणी पाहावयास मिळत आहे या खेळामुळे मुलांची भीती हीच नष्ट होण्यास मदत होते.त्यासाठी मुलांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग घेतला. असे यावेळी म्हणाले.डॉ शर्वरी कुलकर्णी, अनिल पावटे यांचे हे कोणाचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमांमध्ये मराठी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी उपस्थित्यांनी टाळ्यांची साद दिली. यानंतर ब्लॅक बेल्ट परीक्षेमध्ये तेरा विद्यार्थिनी सहभाग घेतला होता.प्रथम क्रमांक सई लांडबिले, द्वितीय क्रमांक सानवी शेट्टी,तृतीय क्रमांक तनवी लांडबिले व चतुर्थ क्रमांक स्वरा डांगे व मुलांमध्ये प्रथम क्रमांक शलक शेट्टी द्वितीय क्रमांक,साई निमसे तृतीय क्रमांक, आशिष प्रभुणे व चतुर्थ क्रमांक, सुजय वाघमारे, त्याचप्रमाणे श्रावणी कोरेकर कशिश पावटे ईश्‍वरी गुंजाळ प्रियदर्शनी येडुलकर ध्रुव पटेल या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली. यावेळी पंधरा विद्यार्थ्यांची निवड झाली होती ज्या विद्यार्थ्यांनी आयोध्या येथे कार्यक्रम केला त्यांचा सत्कार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या  कार्यक्रमाच निवेदन व प्रास्ताविका भावना निमसे श्रावणी निमसे, प्राची निमसे व अंजुम शाह यांनी कराटे प्रशिक्षक म्हणून विजय मोगले यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS