Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांप्रती कृतज्ञतेची भावना असावी : दिनकर पाटील

‘सन्मान स्त्रीशक्तीचा’ कार्यक्रमास उदंड प्रतिसाद

नाशिक : वेगवेगळ्या नात्यांतून, वेगवेगळ्या भूमिकांतून महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठबळ देत असतात. अगदी जन्मदात्या आईपासून आपल्या आयुष्यात व

अवधूत गुप्तेच्या घरात माकडाचा धुमाकूळ
अखेर कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुटले
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १४ अ‍ॅपवर बंदी

नाशिक : वेगवेगळ्या नात्यांतून, वेगवेगळ्या भूमिकांतून महिला आपल्या कुटुंबातील सदस्यांना पाठबळ देत असतात. अगदी जन्मदात्या आईपासून आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका बजावणार्‍या प्रत्येक महिलेविषयी आपल्या मनात कायम कृतज्ञतेची भावना असायला हवी असे मत नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर आण्णा पाटील यांनी व्यक्त केले.

इंदिरानगर येथील सुदर्शन लॉन्स येथे लोकज्योती महिला मंडळ व समन्वय समिती आयोजित सन्मान स्त्रीशक्तीचा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेविका लता पाटील, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक जितेंद्र येवले व देवराम सैंदाणे, लोकज्योती महिला मंडळाच्या अध्यक्षा कुमुदिनी कुलकर्णी, वैशाली पिंगळे, वर्षा महाजन, सुरेखा अमृतकर, जया खोडे, स्मिता जोशी उपस्थित होत्या.

श्री. पाटील म्हणाले की, गृहीणी हा प्रत्येक घरातील कणा असते. तिची मेहनत दिसत नसली तरी त्याशिवाय घर उभे राहू शकत नाही. त्यामुळे महिलांचा यथोचित सन्मान करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. येणार्‍या काळात मुलींसाठी नोकर्‍या तर ज्येष्ठ महिलांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना आनंदी जीवन जगण्यासाठी मी कार्य करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जितेंद्र येवले यांनी करून महिलांसाठी मनोरंजन, पर्यटन व आरोग्याचे उपक्रम राबविण्यात यावेत असे सांगितले. या कार्यक्रमात भजनी मंडळ, महिला मंडळ, हास्य क्लब, योगा क्लब, भिशी क्लब आदींचा यथोचीत सन्मान करण्यात आला. एकुण ७५ मंडळाच्या महिला पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या. यावेळी हास्याचे प्रात्याक्षिक दाखवून आनंदी जीवन जगण्याचा मंत्र देण्यात आला. तसेच विविध प्रश्‍नमंजुषेच्या माध्यमातून महिलांच्या ज्ञानात भर घालून विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साहित्यिक, कवी रविंद्र मालुंजकर यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थित लाभली.

COMMENTS