नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित केल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या पाच वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. यामध्ये सुरजेवाला यांच्यासोबत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेतील पक्ष प्रतोद माणिकम टागोर, आसामचे प्रभारी जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली छावणीतील स्मशानभूमीत कथित बलात्कार आणि हत्या झालेल्या नऊ वर्षांच्या दलित मुलीच्या आई-वडिलांचे छायाचित्र शेअर केले होते. यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला नोटीस पाठवत बलात्कार पीडितेची ओळख जाहीर करणारे ट्विट हटवण्याची मागणी केली होती. यानंतर राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.
COMMENTS