Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र सरलाबेट येथील दिंडीचे राहुरी फॅक्टरीत स्वागत

राहुरी ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सरालाबेट येथील सदगुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथे साई आदर

हाच नियम लोकप्रतिनिधींनाही लावा – नगराध्यक्ष वहाडणे
आत्मा मालिकचा विश्‍वजीत देवकर देशात प्रथम
उक्कडगावमध्ये मुंजोबा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण

राहुरी ः लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सरालाबेट येथील सदगुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे राहुरी फॅक्टरी येथे साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी नामाचा गजर करत हजारो वारकरी सद्गुरू गंगागिरी महाराज पायी दिंडित जवळपास 2000 वारकरी सहभागी झाले असून मोठ्या उत्साहात दिंडी पंढरीकडे मार्गस्थ झाली आहे. आज सकाळी राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी सरालाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे पूजन साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे व संगीता कपाळे यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर साई आदर्श परिवाराच्या वतीने हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी बोलताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी आतुरलेला आहे.वारकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधकांचा समावेश आहे पांडुरंगाच्या चरणी लवकरात लवकर पाऊस व्हावा आणि माझा बळीराजा सुखी व्हावा हीच विनवणी आहे. तसेच नेहमी सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या साई आदर्श मल्टिस्टेटचे शिवाजीराव कपाळे यांच्या कार्याचे महंत रामगिरी महाराज यांनी कौतुक केले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत गिते, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, माजी नगराध्यक्ष ज्योतीताई त्रिभुवन, किशोर थोरात, डॉ. विजय कोते, पारस नहार, नाना वाळूंज, देवीदास कोठुळे, संदीप मुसमाडे, धीरज कपाळे, उमाताई गिते, चैताली कपाळे, सर्जेराव शेटे, आदिंसह साई आदर्श मल्टिस्टेटचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रसंगी सर्वांचे आभार साई आदर्श मल्टिस्टेटचे मॅनेजर सचिन खडके यांनी मानले.

COMMENTS