Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीच्या 12 लाख 77 हजाराच्या 24 मोटारसायकल हस्तगत

कोपरगाव शहर पोलिसांची कामगिरी

कोपरगाव शहर ः कोपरगाव निवारा येथील प्रकाश सुखदेव कांगणे यांच्या निवारा कॉर्नर कोपरगाव येथील राहत्या घरासमोरून एच एफ डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम

लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांना पुरस्कार प्रदान 
रोटरी क्लब अकोले तीन पुरस्कारांनी सन्मानित
त्रिवेणीश्‍वर येथील श्रीमद भागवत कथा सोहळयाचे ध्वजपूजन उत्साहात

कोपरगाव शहर ः कोपरगाव निवारा येथील प्रकाश सुखदेव कांगणे यांच्या निवारा कॉर्नर कोपरगाव येथील राहत्या घरासमोरून एच एफ डिलक्स मोटार सायकल क्रमांक एम. एच 15 एच जे 8213 व त्यांचा शेजारी असलेले नितीन नाधु लष्करे यांची एच एफ डिलक्स एम एच 17 सी एफ 0431 अशा दोन मोटार सायकली कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या बाबत प्रकाश सुखदेव कांगणे यांचे तक्रारीवरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु. रजि. नंबर 177/2024 भादवि क 379,411 प्रमाणे दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पकडलेल्या आरोपीकडून तब्बल 12 लाख 77 हजाराच्या 24 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. सदर गुन्ह्याचा तपास कोपरगाव शहर पोलिस करत आसतांना 22 जून 2024 रोजी शहर पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांना गोपनीय बातमीदारा मार्फत श्रावण सखाराम वाघ रा. सोमठाणे जोश ता. येवला याच्या कडे चोरीची मोटार सायकल असल्याची माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोहेको बी.एस. कोरेकर, पोहेकॉ डि.आर. तिकाणे, पोहेकॉ जालिंदर तमनर, पोहेकॉ अर्जुन दारकुंडे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ श्रीकांत कुन्हाडे, पोकॉ महेश फड यांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना देवून सदर संशयीत आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले असता या पथकाने श्रावण सखाराम वाघ रा.सोमठाणे जोश ता. येवला यास त्याचा गावातून ताब्यात घेवुन त्याचेकडे चोरीच्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता.

त्याने सुरवातील उडवाउडवीची उत्तरे दिली असता पोलिसी खाक्या दाखवताच कृष्णा प्रकाश शिंदे रा. इंदिरानगर, कोपरगाव याने कोपरगाव परिसरातुन चोरलेल्या मोटार सायकली माझा कडे विक्रीसाठी आणून दिलेल्या असून दोन मोटार सायकली माझा कडे असल्याची कबुली दिली असता त्याचा कडून त्या दोन मोटार सायकली ताब्यात घेत पोलिसांनी त्या आरोपीस ताब्यात घेतले. तर मोटार सायकल चोरी करणारा मुख्य आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे रा. इंदिरानगर कोपरगाव याचा शोध पोलीस घेत असतांना मोटार सायकलवरुन तो पळुन जात असतांना पोलिसांनी पाठलाग करुन त्यास पकडत पोलिस स्टेशनमध्ये त्या चोरीच्या मोटार सायकल बाबत त्याच्याकडे अधिकची विचारपुस केली असता त्याने देखील सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कोपरगाव शहरातून विविध ठिकाणावरुन वेगवेगळ्या कंपनीच्या मोटार सायकल चोरी केल्या असल्याची कबुली देवून सर्व मोटार सायकल या श्रावण सखाराम वाघ रा. सोमठाण जोश ता. येवला  याचेकडेस दिल्या असल्याचं सांगितल्याने सदर आरोपीना गुन्हयात अटक करुन नमुद आरोपी व श्रावण सखाराम वाघ यांना समोरा समोर घेवुन त्यांचेकडेस चोरीच्या मोटार सायकल बाबत विचारपुस करुन तपास केला असता आरोपी कृष्णा प्रकाश शिंदे याने कोपरगाव शहरात व परिसरातून चोरलेल्या मोटार सायकली आरोपी श्रावण सखाराम वाघ याचेकडे विक्रीसाठी दिले असल्याचे कबूल केले असता त्याचा कडून तब्बल 12 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या तब्बल 24 मोटार सायकली पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या असून आरोपी सध्या पोलिस रिमांड मध्ये आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदिप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत. सदरची कारवाई अहमदनगर पोलिस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबमें, उपविभागीय पोलीस अधीकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस निरीक्षक प्रदिप देशमुख, सपोनि विश्‍वास पावरा, सपोनि मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोहेकॉ बी.एस. कोरेकर, पोहेको तिकाणे, पोहेकॉ जालींदर तमनर, पोहेकॉ अर्जुन दारकुंडे, पोहेकॉ उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यलय अशोक शिंदे, पोहेकॉ दिपक रोकडे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ श्रीकांत कुर्‍हाडे, पोकॉ महेश फड, पोकॉ बाळु चोंगडे  कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.

COMMENTS