Homeताज्या बातम्यादेश

गोव्यात भरणार 58 वे प्रादेशिक स्तरीय टपाल न्यायालय

पणजी ः गोवा प्रदेशाचे पोस्टमास्तर जनरल 28 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता 58 वे प्रादेशिक स्तरीय टपाल न्यायालय भरवणार आहेत. ‘पोस्टमास्तर जनरल कार्यालय,

अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडके व धड वेगवेगळे करून तरुणाचा खून | LOKNews24
आमच्यावर अन्याय करा तर आम्ही एका मिनिटात पलटी मारतो : सुजय विखे
धनगर समाजाच्या उपोषणाची सरकारकडून दखल

पणजी ः गोवा प्रदेशाचे पोस्टमास्तर जनरल 28 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता 58 वे प्रादेशिक स्तरीय टपाल न्यायालय भरवणार आहेत. ‘पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा प्रदेश, पणजी 403001’ इथे हे न्यायालय होणार आहे. गोवा प्रदेशातील टपाल सेवेबाबत तक्रार केल्याला सहा आठवडे उलटून गेले तरी कायम राहिल्या आहेत अशा तक्रारींवर हे न्यायालय लक्ष केंद्रीत करणार आहे.
पत्रव्यवहार, स्पीड पोस्ट, खिडकी सेवा, बचत खाती आणि न मिळालेल्या मनीऑर्डर याबाबतच्या तक्रारींचीही दखल टपाल न्यायालयात घेतली जाणार आहे. ग्राहकांनी त्यांच्या तक्रारीबाबत तारखा, नावे, मूळ तक्रार ज्याच्याकडे केली त्या अधिकार्‍याचे नाव आणि पद इत्यादी सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे. टपाल न्यायालयात उपस्थित राहण्यास इच्छुक ग्राहकांनी त्यांच्या तक्रारींची नक्कल प्रत ‘सहाय्यक संचालक, टपाल सेवा-1, पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा प्रदेश, पणजी 403001’ या पत्त्यावर पाठवावी. या स्वीकारण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 ही आहे. देशाच्या सामाजिक आर्थिक जीवनात टपाल खात्याची महत्त्वाची भूमिका आहे. देशातील जवळपास प्रत्येक नागरिकापर्यंत टपाल खाते पोहोचलेले आहे. उत्तमोत्तम सेवा देण्याचा टपाल खात्याचा प्रयत्न असतो मात्र प्रभावी संवादाअभावी काही वेळा सेवांमध्ये त्रुटी राहतात व त्यातून समस्या, तक्रारी निर्माण होतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी टपाल खाते नियमित टपाल न्यायालयांचे आयोजन करते आणि टपाल अधिकारी व ग्राहकांना समोरासमोर आणून तक्रार निवारणाच्या दिशेने काम करते.

COMMENTS