Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारा बलुतेदारांचा एल्गार

9 ऑगस्ट रोजी राज्यभर निघणार एल्गार यात्रा

अहमदनगर ः राज्य सरकारकडून बारा-बलुतेदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून, हा समाज भरडला जात आहे. मराठा-ओबीसी संघर्षात संख्येने कमी अस

कु. गुंजन अग्रवालचा सत्कार
अखेर वंचितंच्या बोंबाबोंब आंदोलनाची दखल ः अँड. डॉ. अरुण जाधव
लंकेंनी शपथ घेतली आणि नितीनने घातली पायात चप्पल

अहमदनगर ः राज्य सरकारकडून बारा-बलुतेदारांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून, हा समाज भरडला जात आहे. मराठा-ओबीसी संघर्षात संख्येने कमी असलेला हा बारा-बुलतेदारांचा राजकीय वापर होत असला तरी, त्यांच्या हक्कांसाठी कुणीही बोलत नाही. याविरोधात बारा बलुतेदार संघटनेने एल्गार पुकारला असून, क्रांतीदिनी अर्थात 9 ऑगस्ट रोजी संत गाडगेबाबांची कर्मभूमी येथून एल्गार यात्रा काढण्याचा निर्णय बारा बलुतेदार संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला.
पुण्यात मंगळवारी बारा बलुतेदार महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक कल्याणराव दळे बारा बलुतेदार संघटनेचे राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य यांच्या बैठकीत अनेक सामाजिक मुद्द्यावर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. भारतीय घटनेच्या शिल्पकारांनी जो अधिकार दिला आहे, तो अधिकार बारा बलुतेदारांना नाकारण्यात आलेला आहे. अनेकांनी बारा-बलुतेदारांचा राजकीय वापर केला असल्याचा सूर राज्य कार्यकारणीच्या बैठकीत निघाला असून रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी बारा बलुतेदार महासंघाने केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे. सदर प्रस्ताव सध्या राष्ट्रपती महोदय यांच्या कार्यालयात मंजुरीसाठी प्रस्तावित आहे. राज्यातील बारा बलुतेदार यांच्या जनजागृतीसाठी क्रांती दिन 9 ऑगस्ट पासून संत गाडगेबाबा कर्मभूमी येथून बारा बलुतेदार अठरा पगड जाती, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यलगार यात्रा काढण्यात येणार आहे.
9 ऑगस्ट क्रांतीदिनी सुरू होणारी एल्गार रथ यात्रेची सांगता 12 सप्टेंबर 2024 रोजी चैत्यभूमी मुंबई येथे होणार आहे. तसेच शिवाजी पार्क मुंबई येथे बारा बलुतेदार यांची जाहीर सभा घेण्यात येणार असल्याचे नियोजन राज्य कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आली आहे. सदरील बैठकिस सतीश दरेकर कार्याध्यक्ष, प्रतापराव गुरव उपाध्यक्ष, चंद्रकांत गवळी सरचिटणीस, अशोकराव सोनवणे, विजय पोहनकर, पांडुरंग कुंभार, सतीश कसबे, धनंजय शिंगाडे, भगवान श्रीमंदीलकर, मुजावर, यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS