Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमैया महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कोपरगाव : स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन योग दिन साजरा करण्यात आल

डॉ. कुमार सप्तर्षी यांना मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना पुरस्कार प्रदान
ऑक्सिजन देणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी लोकचळवळ निर्माण व्हावी :- फिरोजभाई पठाण
मनपाच्या स्थायी समितीच्या सभापतीना कैकाडी समाजाच्या वतीने निवेदन

कोपरगाव : स्थानिक के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन योग दिन साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस यादव यांनी दिली. 57 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एन.सी.सी., एन.एस.एस., क्रिडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या योग शिबिरात प्रज्वल ढाकणे व वैष्णवी ढाकणे यांनी योग, प्राणायाम व व्यायामाचे विविध प्रात्यक्षिके विद्यार्थांसमोर केली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी योगाचे महत्त्व नमूद करतांना सांगितले कि ’मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योगासनांचे मोलाचे स्थान आहे. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, शा. शि. संचालक डॉ.सुनिल कुटे, क्रीडा शिक्षक मिलिंद कांबळे, एन.सी.सी. प्रमुख डॉ. एन.जी.शिंदे, लेफ्टनंट प्रा. वर्षा आहेर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS