पुणे : राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष वाढत असतांनाच दुसरीकडे बार्टी, सारथी महाज्योती टीआरटीआय अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठ
पुणे : राज्यात मराठा-ओबीसी संघर्ष वाढत असतांनाच दुसरीकडे बार्टी, सारथी महाज्योती टीआरटीआय अशा संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठी देण्यात येणार्या शिष्यवृत्तीचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांच्या कामकाजात समानता आणण्याचा निर्णय घेऊनही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून अद्याप वंचित आहेत. त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थी एल्गार करण्याच्या तयारीत असून, 24 जून ते 2 जुलै या कालावधीत पुण्यातील महात्मा फुलेवाडा ते मुंबईतील विधानभवन या मार्गावर पायी फेरी (लाँग मार्ग) काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सारथी, महाज्योती आणि बार्टी या संस्थांशी संबंधित पीएच.डी धारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पुणे ते मुंबई असा लाँग मार्च काढायचे या विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. पुण्यातील महात्मा फुले वाड्यातुन या लाँगमार्चला सुरुवात झाली असून पुढचे काही दिवस पुणे ते मुंबई हे अंतर पायी चालत हे विद्यार्थी विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात मुंबईत पोहचणार आहेत. राज्य शासनातर्फे बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय अशा संस्थांच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र काही महिन्यांपूर्वी या तीन्ही संस्थांचा शिष्यवृत्ती वाटपाचा अधिकार राज्य सरकारने काढुन घेतल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, टीआयटीआय या संस्थांतील संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून तो प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अशी प्रमुख मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
COMMENTS