कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नुकत
कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अॅड. संदीप वर्पे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. संदीप वर्पे म्हणाले रयत शिक्षण संस्थेचे हे गुणवंत महाविद्यालय आहे. शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महाविद्यालयातील प्राध्यापक सातत्याने प्रयत्न करत असतात. मूलभूत सुविधा साधनसामुग्री प्रशासन, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक यासारख्या पायाभूत सुविधा महाविद्यालयात आहेत. त्याच पद्धतीने ‘कमवा आणि शिका 39; योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सांस्कृतिक उपक्रम, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, महाविद्यालयातील विविध उपक्रम यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत असते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी आपल्या अध्यक्ष मनोगतात सांगितले की, महाविद्यालयाची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ ही कौतुकास्पद आहे. गुणवत्तेची एक परंपरा असणारं हे एक महाविद्यालय आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणताही विद्यार्थी मागे राहत नाही. निष्ठा, निर्णय क्षमता, नियमितता, निरीक्षण या चतु:सुत्रीचा अवलंब करून यशस्वी होता येईल. विज्ञान विभागामध्ये सोनवणे श्रुती विनोद 86.17 टक्के गुण मिळवून प्रथम आली. ठोंबरे ऋषिकेश निखिल 78.83 द्वितीय क्रमांक, कदम दीक्षा रवींद्र याने 78.33 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला तर वाणिज्य विभागांमध्ये कु. विखे पूजा बाळासाहेब 87.17 टक्के गुण मिळून प्रथम द्वितीय क्रमांक विखे भक्ती सोमनाथ 84.67 टक्के, पवार कार्तिकेश रामचंद्र 80.83 टक्के तृतीय क्रमांक, कला विभागामध्ये शेख सीमा कैसर 77.83%, द्वितीय क्रमांक कुमारी शेख सिफा कैसर 75.67 टक्के, तृतीय क्रमांक शिंदे अश्विनी संतोष 70.17 टक्के मिळून त्यांनी यश संपादन केले. तर किमान कौशल्यामध्ये पाटील श्रावण कुमार हेमंत 60.83 टक्के प्रथम क्रमांक, खोंड आदित्य अनिल 57.50 टक्के द्वितीय क्रमांक, शेख अलबक्ष महबूब 56.33 टक्के तृतीय क्रमांक गुण प्राप्त केले आहेत. नीट परीक्षेत जाधव ओंकार सतीश 720 पैकी 676 गुण मिळवून घवकवीत यश संपादन केले. कदम ऋषिकेश जनार्धन याने 720 पैकी 515 गुण तर कवडे आदित्य राजेंद्र 720 पैकी 505 गुण प्राप्त केले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथी अॅड. संदीपजी वर्पे तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला भोर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बाबासाहेब वर्पे तर ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य संजय शिंदे प्रा. कळमकर हे आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा. कळमकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्रा. सुनीता अत्रे व प्रा. सुशीला ठाणगे यांनी केले.
COMMENTS