Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सप्तशृंगी गडासह 31 गावांवर दरड कोसळण्याचा धोका

नाशिक : पावसाळ्यात दरड कोसळून ’माळीण’ सारखी दुर्घटना घडू नये, यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तश्रृंगी गडासह कळ

महात्मा बसवेश्वर, राजीव गांधी यांचे पुतळे हटवू नयेत
कुंभार समाजातर्फे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा
सामाजिकतेचे राजकिय भान!

नाशिक : पावसाळ्यात दरड कोसळून ’माळीण’ सारखी दुर्घटना घडू नये, यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तश्रृंगी गडासह कळवण तालुक्यातील 31 धोकादायक गावांची यादी तयार केली असून, पावसामुळे या गावांमध्ये भूस्खलन होण्याचा धोका अधिक असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी प्रस्ताव पाठवला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंग गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून 91 कोटी 20 लाखांचे तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही.

COMMENTS