Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ ः आ.आशुतोष काळे

कोपरगाव :अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्‍या व विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं

समृद्धीच्या इंटरचेंजला शिर्डी-कोपरगाव इंटरचेंज नाव द्या
शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीचा लौकिक वाढवा
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी सदैव तत्पर ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव :अराजकतेच्या पार्श्‍वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्‍या व विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्‍या राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.
स्वराज्य प्रेरिका, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास आ. आशुतोष काळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, राजमाता जिजाऊ पराक्रमी व धैर्यशील होत्या त्याचबरोबर समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणार्‍याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती करून धर्माला लौकिक कसा मिळवून द्यायचा हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवून राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली.राजमाता जिजाऊंमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले व त्यांच्या मागर्दर्शनाखाली व प्रेरणेतूनच महाराष्ट्राच्या भूमीत रयतेचे स्वराज्य स्थापन झाले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

COMMENTS