Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रध्दा सबुरी संदेशातून साईमहिमा सातासमुद्रापार ः नितीन कोल्हे

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील अंबिका धोंडीबानगरीत साईभक्त धोंडीरामबाबा चव्हाण यांनी अतिशय कष्ट घेवुन साईधाम साईबाबा मंदिर

राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
प्रशासकांच्या नाकर्तेपणामुळे नगर अर्बन बँकेवर निर्बंध
आंबिल ओढा परिसरात मनपाची अतिक्रमण घरावर मोठी कारवाई l पहा LokNews24

कोपरगाव तालुका ः तालुक्यातील नगर मनमाड महामार्गावरील अंबिका धोंडीबानगरीत साईभक्त धोंडीरामबाबा चव्हाण यांनी अतिशय कष्ट घेवुन साईधाम साईबाबा मंदिर निर्माण कार्य करत श्रध्दा सबुरी संदेशातुन साईमहिमा सातासमुद्रापार पोहोचविला असे प्रतिपादन संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी केले.
             सालाबादप्रमाणे याही वर्षी साईधामचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा रविवारी मोठ्या भक्तीमय वातावरणांत साजरा करण्यांत आला त्याप्रसंगी ते बोलत होते. या वर्धापनदिन सोहळयास महाराष्ट्र, पंजाब, गोवा, हरियाणा, गुजराथ, कर्नाटक यासह देश विदेशातील साईभक्त उपस्थित होते. साईबाबा मंदिर, धोंडीरामबाबा समाधीमंदिर, ध्यानधारणा केंद्र, मनोकामना वृक्ष, जुनी कुटी, आदि परिसर विशेष फुलांबरोबरच अननस,  सफरचंद, केळी, आंबे, पेरू, टरबूज,  खरबूज, डाळिंब आदी फळांच्या सजावटीने सजविण्यांत आला होता. पुणे येथील राकेश देवळे यांच्याकडुन ही सजावट व साईमुर्तीशेजारी मोरांच्या जोडीचा आरस करण्यांत आला होता, असंख्य साई भक्तांनी भ्रमणध्वनी मध्ये या सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण केले. प्रारंभी विजय नायडु, सुरेश चव्हाण, एकनाथ चव्हाण व साहेबराव मढवई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नानासाहेब नवले यांनी प्रास्तविकात रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाची संपुर्ण माहिती दिली. नितीन कोल्हे पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय देवस्थान साईबाबांच्या शिर्डी दर्शनांसाठी देश विदेशातील भाविक येतात., शिर्डीजवळच कोपरगांव ऐतिहासिक पौराणिक पर्यटनस्थळामुळे प्रवासात असंख्य भाविक साईधाम परिसरातही दर्शनासाठी येतात. धोंडीबाबा चव्हाण यांची वाचा सिध्द होती त्याची अनुभूती असंख्य साईभक्तांना आलेली आहे. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार आशुतोष काळे, आमदार प्रकाश देवळे, पी. डी. पाटील आदि उपस्थित होते. भाविकांना बुंदी, पुरीभाजी, मसालेभात महाप्रसादाचे वाटप केले. शेवटी सुरेश चव्हाण यांनी आभार मानले.

COMMENTS