Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीत पाणीबाणी; भाजपाकडून ‘आप’ विरोधात आंदोलन

जल बोर्डाच्या कार्यालयाची तोडफोड

नवी दिल्ली / प्रतिनिधी : हरियाणातील भाजपा सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नाही. दुसर्‍या बाजूला दिल्लीत पाणी संकट अधिक भिषण झाले आहे. भाजपा का

कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात विष घेऊन एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
नगर अर्बन बँकेचे अधिकारी…आता रडारवर
चोपडा नगरपालिकेकडून कर वसुलीला सुरुवात ; थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट

नवी दिल्ली / प्रतिनिधी : हरियाणातील भाजपा सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नाही. दुसर्‍या बाजूला दिल्लीत पाणी संकट अधिक भिषण झाले आहे. भाजपा कार्यकर्त्यांकडून दिल्ली जल बोर्डाची तोडफोड करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. यावरून राजधानीतील राजकारण तापू लागले आहे. रविवारी छत्रपूर येथील दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. वृत्तसंस्थेने दिलेल्या व्हिडीओमध्ये दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयात तोडफोड झाल्याचे दिसत आहे. आम आदमी पक्षानेही एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये भाजपाचे कार्यकर्ते कार्यालयात तोडफोड करत आहेत, असा दावा त्यांनी केला. भाजपाचा गमछा गळ्यात असलेले कार्यकर्ते या व्हिडीओत दिसत आहेत.

एका बाजूला हरियाणातील भाजपा सरकार दिल्लीच्या हक्काचे पाणी सोडत नाही. दुसर्‍या बाजूला दिल्लीत भाजपा कार्यकर्ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करत आहेत. भाजपाचे नेते आणि माजी खासदार रमेश बिधुरी यांनी ‘आप’चे आरोप फेटाळून लावले. दिल्लीतील द्वारका जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्‍नावरून तणाव निर्माण झाला आहे. सार्वजनिक नळाद्वारे मिळणार्‍या पाण्यावरून झालेल्या वादातून हाणामारी झाल्यामुळे तीन लोक जखमी झाले. पाण्याच्या संघर्षाला कोणतेही जातीय वळण नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. दिल्लीच्या जलमंत्री आतिशी सिंह यांनी वाढता संघर्ष लक्षात घेऊन दिल्लीचे पोलीस आुयक्त संजय अरोरा यांना पत्र लिहून तोडफोडीपासून पाण्याच्या पाईपलाईनचे संरक्षण करण्यासाठी कर्मचारी तैनात करण्याची विनंती केली आहे. दक्षिण दिल्लीत पाण्याच्या पाईपलाईनला जाणीवपूर्वक नुकसान पोहोचवले जात आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई आणखी वाढत आहे, असा आरोप त्यांनी केला.

COMMENTS