Homeताज्या बातम्याक्रीडा

पाकिस्तानच्या आशा जिवंत तर श्रीलंकेच्या संपुष्टात

क्रिकेट समिक्षक.

सन २०२४ ची विश्वचषक स्पर्धा तशी बघाल तर पाकिस्तानसाठी निरस ठरत होती. नवख्या अमेरिका पाठोपाठ पारंपारीक प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव पत्कराव्या लाग

महाराष्ट्र दिनी ‘महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धे’चे आयोजन करणार : उपमुख्यमंत्री पवार
कु. पायल जाधव हिला जयपूर येथे तायक्वांदो स्पर्धेत दोन सुवर्णपदक
जपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक

सन २०२४ ची विश्वचषक स्पर्धा तशी बघाल तर पाकिस्तानसाठी निरस ठरत होती. नवख्या अमेरिका पाठोपाठ पारंपारीक प्रतिस्पर्धी भारताकडून पराभव पत्कराव्या लागल्यानंतर स्पर्धेतील त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. विशेष म्हणजे त्या दोनही सामन्यात ते जिंकण्याच्या स्थितीत होते. परंतु कधी फलंदाजांच्या तर कधी गोलंदाजांच्या गलथानपणामुळे त्यांच्यावर हि वेळ ओढवली आहे.

        अशातच मंगळवारी पाकिस्तानने कॅनडाविरुद्ध  टि २० विश्वचषकातील बावीसावा सामना सात गडी राखून जिंकून सुपर-८ च्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे.  या विजयासह बाबर आझमच्या संघाच्या निव्वळ धावगतीमध्ये सुधारणा झाली आहे. आता त्यांचा नेट रन रेट + ०.१९१ इतका झाला आहे. या बरोबरच ते दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. पाकिस्तानला आपला पुढचा सामना आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना १६ जून रोजी लॉडरहिल येथे खेळला जाणार आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत मोठ्या फरकाने जिंकावे लागेल. सध्या तरी गुणतालिकेत भारत चार गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी अमेरिका चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बारा जून रोजी हे दोन्ही संघ आपसात भिडतील.

             न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ॲरॉन जोन्सच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर कॅनडाने वीस षटकांत ७ गडी गमावून १०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या नाबाद ५३ धावांच्या खेळीच्या जोरावर १७.३ षटकांत तीन गडी गमावून १०७ धावा केल्या. चालू स्पर्धेतील हा पाकिस्तानचा पहिलाच विजय आहे. 

              विजयासाठीच्या १०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला पहिला धक्का वीस धावांवर बसला. पाचव्या षटकाच्या दुस-या चेंडूवर सॅम अयुबला हेलिगरने मोव्ह्वाकरवी झेलबाद केले. त्याला केवळ सहा धावा करता आल्या. न्यूयॉर्कच्या संथ खेळपट्टीवर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी ६२ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची भागीदारी केली. हेलेगरने  पंधराव्या षटकात बाबरला आपला बळी बनवले. तो ३३ चेंडूत ३३ धावा करून माघारी परतला. फखर झमान चार धावांवर तर उस्मान खान दोन धावा करून नाबाद राहिले. मोहम्मद रिझवानने ५३ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळी खेळली. या दरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. कॅनडाकडून डिलन हेलिगरने दोन आणि जेरेमी गॉर्डनने एक विकेट घेतली.

             नाणेफेक गमावल्यातर प्रथम फलंदाजीला आलेला कॅनडाचा संघ पाकिस्तानी गोलंदाजांसमोर झुंजताना दिसला. ॲरॉन जॉन्सन शिवाय कॅनडाचा एकही फलंदाज चांगला खेळला नाही. त्याने ४४ चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली. या दरम्यान त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि तेवढेच षटकार आले. या सामन्यात नवनीतने चार, परगतसिंगने दोन, निकोलसने एक, श्रेयसने दोन, रविंदर पालने शून्य आणि साद बिन जफरने दहा धावा केल्या. तर कलीम सना १३ आणि डिलन हेलिगर नऊ धावा करून नाबाद राहिले.  पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हरिस रौफने प्रत्येकी दोन बळी घेतले.  याशिवाय शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

             श्रीलंका आणि नेपाळ यांच्यात विद्यमान विश्वचषक स्पर्धे मधील तेवीसावा सामना बुधवारी एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला. पावसामुळे हा सामना नाणेफेक न होता रद्द करण्यात आला.  यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.  ड गटातील गुणतालिकेत नेपाळ चौथ्या स्थानावर आहे तर श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. याचबरोबर दक्षिण आफ्रिका सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे.  ते सुपर-8 साठी पात्र ठरले आहे. आता त्यांना त्यांचा चौथा सामना १५ जून रोजी नेपाळविरुद्ध खेळायचा आहे.

            पावसाच्या अवकृपेमुळे श्रीलंकेच्या टि२० विश्वचषकाची दुसरी फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या असून ड गटातील नेपाळच्या अडचणीही वाढल्या आहेत.  दोन्ही संघ अजूनही स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याच्या शोधात आहेत.  नेपाळच्या नजरा आता दक्षिण आफ्रिकेवर खिळल्या आहेत.  टि२० विश्वचषक स्पर्धेच्या पुढील फेरीसाठी प्रोटीज संघाने आधीच तिकीट बुक केले आहे.  श्रीलंकेचा शेवटचा सामना १७ जून रोजी नेदरलँडशी होणार आहे.

COMMENTS