संगमनेर ः संगमनेर शहराला मंगळवार (दि.11) झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांश
संगमनेर ः संगमनेर शहराला मंगळवार (दि.11) झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तासाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यावर सर्वत्र पाण्याचे नाले प्रवाहित होऊन रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. नवीन नगर रस्त्यावर गुडघाभरापेक्षा अधिक उंचीने पाणी वाहताना दिसत होते.
शनिवारी झालेल्या पावसामुळे संगमनेरात शेतीच्या कामाला वेग आला असताना मंगळवारी देखील पावसाने संगमनेरात जोरदार हजेरी लावली. मंगळवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात वातावरणात उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावणे चारच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे जोरदार पडणार्या पावसामुळे नेहमीप्रमाणे शहरातील नाल्यांची दूरवस्था पुन्हा एकदा उघडी पडली होती. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची एकच धावपळ उडाली. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या प्रमाणात संगमनेरत पाऊस पडल्याने गोंधळ उडाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक दुचाकी निम्म्याहून अधिक पाण्यात गेल्याने बंद पडल्या होत्या. त्यामुळे दुचाकी चालकांचे प्रचंड हाल झाले. अनेक चार चाकी वाहने देखील रस्त्याच्या मधोमध अडकून पडली होती.
COMMENTS